नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढ करण्याबाबत ठराव घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. सुरुवातीला थकीत घरपट्टीबद्दल शासनाचा नियम सांगण्यात आला. त्यात थकीत घरपट्टी वसुली साठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय ग्रामसभेत ग्रामस्थ घेऊ शकतात किंवा त्या शासन निर्णयाला ग्रामसभा विरोध करू शकतो असा नियम आहे. त्यामुळे सभेत हा विषय उपस्थितीत होताच माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी ठराव घेत कोणालाही घरपट्टी मध्ये सवलत देऊ नये आणि थकीत असलेली सर्व घरपट्टी वसुली करण्यासाठी ठोस नियोजन कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता धारक ग्रामस्थ यांच्या कडून 90 लाखाची थकबाकी आहे. ती सर्व थकबाकी वसूल करावी आणि शासनाच्या निर्णयानुसार सवलत देण्यास ग्रामसभेने विरोध दर्शवणारा ठराव बहुमताने हात उंचावून मंजूर केला असुन त्या ठरावालादिलीप बोरसे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायत मधील वीज देयके मधील अतिभार बद्दलचा निर्णय गेली सहा महिने पाठपुरावा करून पूर्ण करून घेणारे प्रशासक सुजित धनगर,ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले आणि ग्रामस्थ अंकुश दाभने यांचा अभिनंदन ठराव ग्रामस्थ संजय मनवे यांनी मांडला.
नेरळ ग्रामपंचायतमधील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून देण्यात येणारे पाणी यांची करवाढ करण्याचा विषय ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी मांडला. पाणीपट्टी करण्यास बहुसंख्य ग्रामस्थांनी विरोध करीत आधी दोनवेळ पुरेसे पाणी द्या आणि नंतरच पाणीपट्टी वाढ करण्यात यावी अशी भूमिका सूर्यकांत चंचे,सावळाराम जाधव,अक्षय चव्हाण,ॲड सुमित साबळे,सिद्धार्थ सदावर्ते, सुभाष नाईक,परेश सुर्वे,आदी सह अनेक ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते मासिक पाणीपट्टी 210 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नेरळ ग्रामपंचायत ने 2013 मध्ये 60 रुपये मासिक घरपट्टी 125 प्रति महिना करण्यात आली होती. त्यानंतर 12 वर्षांनी नेरळ गावातील पाणीपट्टी वाढ करण्यात आली असून फेब्रुवारी 2026 पासून ही घरपट्टी वाढ लागू होणार आहे.या कालावधीत सर्व थकीत पाणीपट्टी वसुलीचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन प्रशासक सुजित धनगर यांनी दिले.तर नेरळ गावातून जाणाऱ्या मध्य रेल्वेचे पाडा येथील फाटक रेल्वे कडून बंद करण्यात येणार आहे,त्या ठिकाणी भुयारी मार्ग बनवण्यात यावा असा ठराव सूर्यकांत चंचे यांनी मांडला आणि त्या ठरावाला सर्वांनी पाठिंबा दिला.
Ans: नेरळ ग्रामसभेत चर्चेनंतर मासिक पाणीपट्टी 210 रुपये करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. ही वाढ फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे.
Ans: होय. अनेक ग्रामस्थांनी आधी दोन वेळा पुरेसे पाणीपुरवठा करा, नंतरच पाणीपट्टी वाढ करा अशी ठाम भूमिका मांडली होती. मात्र चर्चेनंतर तडजोडीने निर्णय घेण्यात आला.
Ans: नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांकडे सुमारे 90 लाख रुपयांची घरपट्टी थकीत आहे.






