
बैलबाजार परिसरात मेट्रोच्या कामकाजाने पालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली. आधीच वाहतूककोंडी आणि झालेल्या चिखलामुळे बैलबाजार ते गुरुदेव हॉटेलपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात आला. त्यामुळे नाईलाजास्तव परिसरातील नामांकित के. सी. गांधी या शाळेला सलग तीन दिवस सुट्ट्या द्याव्या लागल्या. मेट्रोचं काम जिथे सुरु आहे त्याच रस्त्यालगत ही शाळा असल्याने याचा त्रास शाळकरी विद्यार्थाना सोसावा लागतोय. आधीच वाहतूक कोंडी त्यात जलावाहिनी फुटल्याने पाण्याचा झालेला अपव्यय आणि शाळेला देण्यात आलेली तीन दिवसांची सुट्टी असं कल्याणकरांवर दुहेरी नाही तर तीन समस्यांना सामोरं जावं लागतंय. रस्ताच बंद झाल्याने बससेवा ठप्प झाली. त्यामुळे शाळेत मुलं जाणार तरी कशी? विद्यार्थांना होणारी समस्या गंभीर असल्याने याची दखल घेत शाळेला तीन दिवस सु्टटी देण्यापलिकडे पर्याय राहिला नाही.
दरम्यान जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत कल्याण डोंबिवली मनपा पाणी पुरवठा विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. आज म्हणजेच शुक्रवारी सकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे बंद असलेला मुख्य रस्ता आज दुपारपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असं मनपा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. मेट्रोप्रकल्प हा विकासकामाचा भाग आहे हे कितीही मान्य असलं तरी यामुळे विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये , त्यांच्य़ा शालेय अभ्यासतक्रमावर याचा गंभीर परिणाम होऊ नये याकरिता पालिकेने विशेष काळजी घ्यावी अशी शाळा प्रशासन आणि पालकांनी मांडली आहे.
Ans: मेट्रोच्या कामादरम्यान केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे बैलबाजार ते गुरुदेव हॉटेलपर्यंतचा रस्ता चिखल आणि गाळाने भरला. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा रस्ता काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला.
Ans: मेट्रोच्या चालू कामादरम्यान खोदकाम करताना मुख्य जलवाहिनीला धक्का बसून ती फुटली.
Ans: शाळेजवळील रस्ता पूर्णपणे बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवासाच्या अडचणी टाळण्यासाठी शाळेला सलग तीन दिवस सुट्टी द्यावी लागली.