Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उमेदवार, राजकीय पक्षांच्या खर्चावर करडी नजर ठेवा ! केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांचे निर्देश

विधानसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षामार्फत करडी नजर ठेवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले.

  • By नारायण परब
Updated On: Oct 25, 2024 | 10:40 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार तसेच राजकीय पक्ष करत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षामार्फत करडी नजर ठेवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी सौरभकुमार शर्मा, नागेंद्र यादव, मीतू अग्रवाल, विनोद कुमार, राजेशकुमार मीना व चंचल मीना हे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक दाखल झाले असून ते मतदारसंघनिहाय आर्थिक बाबी आणि खर्चविषयक कामकाजाचा आढावा घेत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिका-यांची खर्च संनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा- पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर तपासादरम्यान कारमध्ये आढळली लाखाेंची रोकड!

प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक

जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर करडी नजर असणार आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहित नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक राहणार आहे.

हे देखील वाचा-MVA Seat Sharing : मविआच्या फार्म्युल्याबाबत अजूनही सस्पेन्स कायम, दिल्लीतील कॉंग्रेसच्या बैठकीत नक्की काय ठरलं? वाचा सविस्तर

या यंत्रणांकडून केली जात आहे तपासणी 

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप, किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, अमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, पोस्ट विभाग, वन विभाग, नागरी उडुयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, यांच्यासह  फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत निवडणूक खर्चासंदर्भात घ्यावयाची खबरदारी याबद्दलची माहिती देण्यात आली.

सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app)

सजग नागरिकांनी  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे  सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app)  डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे जर कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्याची तक्रार नागरिकांना करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. 

 

Web Title: Keep a close eye on the expenses of candidates and political parties instructions of the central inspectorate of election expenditure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 10:40 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political party

संबंधित बातम्या

Election Comission: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्षांवर बंदी; निवडणूक आयोगाची कारवाई
1

Election Comission: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्षांवर बंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

पदाची लालसा कोणाला नाही चुकली? कार्यकर्त्याला सतरंज्या सोडून होऊ वाटतंय नेता
2

पदाची लालसा कोणाला नाही चुकली? कार्यकर्त्याला सतरंज्या सोडून होऊ वाटतंय नेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.