महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संभ्रम कायम आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. उद्या पुन्हा महाविकास आघाडीतीत चर्चा होणार असून त्यानंतर अंतिम जागावाटप जाहीर होणार आहे. बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या करतील, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. दिल्लीत आज कॉंग्रेसची हायकमांड सोबत बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिशदेत ते बोलत होते.
आज AICC मुख्यालय नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुल गांधी, संघटन सरचिटणीस मा. श्री के. सी. वेणुगोपाल, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राशी संबंधित सीईसीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी… pic.twitter.com/UHWESZ7iaB
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 25, 2024
विदर्भातील काही जागा मित्रपक्षांसाठी सोडल्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांवर नाराज आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी नाना पटोले यांनी विचारला असता, नाना पटोले म्हणाले, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईत कॉंग्रेसला जास्त जागा मिळाव्यात ही भावना होती. त्यात काही चुकीचं आहे असं नाही. तरीही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी सर्व पक्षांशी सरकार्याची भावना असेल, असं त्यांनी सांगितलं.
सर्वांनी सत्तेत वाटा मिळाला पाहिजे ही राहुल गांधींची भावना आहे. आघाडीत ज्या जागा ज्या पक्षाला ठरल्या आहेत. त्या प्रत्येकाला दिल्या जातील. २-३ जागांबाबत कॉंग्रेस पक्ष आग्रही होता. त्याबाबत शरद पराव यांचं पत्र आलं आहे. उद्या बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर उद्या अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज दुसरी यादी येणार आहे, उद्या तिसरी आणि अंतिम यादी येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे देखील वाचा-Maharashtra Election 2024 : महाविकास आघाडीत नक्की चाललंय तरी काय? आता नवा फॉर्म्युला, कोण किती जागांवर लढणार?
महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. लोकसभेतील कामगिरीपेक्षा महाविकास आघाडीची चांगली कामगिरी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. महाराष्ट्र फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचाराने चालणारं राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र द्रोही, शिवद्रोही, फुले शाहू आंबेडकर द्रोही सरकार उखडून टाकायचं आहे. मोदी आणि शाह यांच्या सभा जेवढ्या होतील तेवढा मविआचाच फायदा होईल, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला माध्यमांमधून टार्गेट केलं जात आहे. काँग्रेसची भूमिका सोशल इंजिनिअरिंगची असून त्यानुसार ज्या भागात ज्यांचं प्रतिनिधित्व आहे, त्यानुसार त्या पक्षाचा समाजाला जागा देण्याचं काम करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीत 2 ते 3 जागांवर अजूनही चर्चा सुरु आहे. उद्या आमची ऑनलाईन सीईसी होईल आणि अंतिम यादी येईल. महाविकास आघाडीचं जागावाटप आहे, त्यात मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा, असं नाना पटोले म्हणाले.