Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Mahapalika Election 2026: कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?

कोल्हापूर महानगरपालिकेची एकूण सदस्यसंख्या ८१ असून, सत्ता स्थापनेसाठी ४२ हा बहुमताचा आकडा आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 19, 2026 | 04:58 PM
Kolhapur Mahapalika Election 2026: कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?
Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता
  • महापालिका निवडणुकीत भाजपनंतर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा पक्ष
  • भाजपने शिंदे गटाला डावललं तर अनेक महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट वेगळा निर्णय घेऊ शकते
Kolhapur Mahapalika Election 2026: राज्यातील नुकतीच झालेली महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड वगळता सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक म्हणजे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक. कोल्हापूर महापालिका ही गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत कोल्हापुरात आपले वर्चस्व सिद्ध केले. पण त्यानंतरही ते बहुमतापासून दूर राहिले. पण कोल्हापुरात आता राजकीय समीकरणे फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता वर्तवली जातआहे. शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास कोल्हापुरात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आह. त्यादृष्टीने पडद्यामागे जोरदार हालचालीही सुरु आहेत. पण त्याबद्दल आपण आताच काही बोलू शकत नाही, असं सूचक विधान सतेज पाटील यांनी केलं आहे. सतेज पाटलांच्या या विधानाने भाजप मात्र अस्वस्थता पसरली आहे.

Farm to Fork Model in India: भारतात वेगाने रुजतेय युरोपियन मॉडेल ‘फार्म टू फोर्क’; आर्थिक वाढीसाठी ठरेल नवे इंजिन?

कोल्हापुरात नक्की काय समीकरण असू शकतं?

महापालिका निवडणुकीत भाजपनंतर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक महापालिकांवर सत्तेत जायचं असेल तर भाजपला शिंदे गटाची साथ आवश्यकच आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महापौर पदासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. भाजपने शिंदे गटाला डावललं तर अनेक महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट वेगळा निर्णय घेऊ शकते, महापालिकांवर सत्तेत येण्यासाठी शिंदे गटाकडे अनेक पर्यायही उपलब्ध आहेत.  (Municipal Election Result 2026)

मुंबई महापालिकेत भाजपने एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं तर ते कोल्हापुरात काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करू शकतात. याबाबत सतेज पाटील यांना विचारले असता, त्यांनी पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू आहेत. पण याची खुली चर्चा करू शकत नाही, असं म्हणत चांगलाच सस्पेन्स निर्माण केला आहे. काँग्रेसचे ३४ आणि शिंदे गटाचे १५ नगरसेवक एकत्र आल्यास कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करणे शक्य आहे. त्यामुळे शिंदेंच्या मुंबईतील नाराजीचा फायदा काँग्रेसला कोल्हापुरात होऊ शकतो. त्यामुळे भाजपचा मात्र कंडका पडू शकतो. असेही बोलले जात आहे.

War Alert: शांततेच्या नोबेलवरून राडा! डोनाल्ड ट्रम्पची ग्रीनलँड नाही तर ‘या’ देशाला युद्धाची धमकी; स्वार्थासाठी

कोल्हापूर महानगरपालिकेचे पक्षीय बलाबल

कोल्हापूर महानगरपालिकेची एकूण सदस्यसंख्या ८१ असून, सत्ता स्थापनेसाठी ४२ हा बहुमताचा आकडा आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेसने ३४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे, भाजपने २६ आणि शिवसेना (शिंदे गट) ने १५ जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाची एकत्रित संख्या पाहता त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र, जर शिंदे गटाने काँग्रेसला साथ दिली, तर कोल्हापुरातील सत्तेचे संपूर्ण समीकरण बदलू शकते.

 

सतेज पाटील यांचा संघर्ष आणि निकाल

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीविरुद्ध प्रबळ लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सतेज पाटील यांनी महायुतीचा विजयरथ रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असले, तरी काँग्रेसला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कोल्हापुरात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Kolhapur municipal corporation election 2026 in kolhapur the shinde faction is preparing to form a government with the congress sidelining the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 04:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.