Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Nagar parishad Result : कोल्हापूरात नगरपालिका नगरपंचायतींवर महायुतीची सत्ता; भाजप – शिंदेसेना ठरले ‘किंगमेकर’

कोल्हापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींची नगरपालिका निवडणुकीतही महायुतीला ओवाळणी दिली आहे. महायुतीच्या घटक पक्षांचा विजय झाला असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 21, 2025 | 03:11 PM
Kolhapur Municipal Council Election Results 2025 BJP and Shinde Shiv Sena wins

Kolhapur Municipal Council Election Results 2025 BJP and Shinde Shiv Sena wins

Follow Us
Close
Follow Us:

Kolhapur Nagar parishad Election Result : कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी महायुती प्रणित आघाडींचे राजकारण निर्णायक ठरले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील चुरशीच्या लढतीनंतर काही ठिकाणी स्पष्ट बहुमत, तर काही ठिकाणी आघाडी व समझोत्यांच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदललेली पाहायला मिळत आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती यशस्वी ठरली आहे. यामध्ये चार ठिकाणी शिवसेना शिंदे गट, तीन ठिकाणी भाजप, शिरोळ, पेठ वडगाव काँग्रेस स्थानिक आघाड्या, मलकापूर ,पन्हाळा जनस्वराज्य शक्ती पक्षाने सत्ता स्थापन केली आहे या निवडणुकीचा निकाल पाहता विकास, पायाभूत सुविधा आणि केंद्र-राज्य सरकारशी सुसंवाद या मुद्द्यांवर महायुतीने मतदारांना आकर्षित केल्याचे चित्र आहे. विशेषतः शहरी भागातील काही नगरपालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्ता स्थापन करणे सोपे झाले आहे. तर लाडक्या बहिणींची नगरपालिका निवडणुकीतही ओवाळणी दिली असल्याचे प्रभाव आहे.

दुसरीकडे, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी प्रभावी ठरली नाही पेठ वडगाव, शिरोळ वगळता अन्यत्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकूणच, कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आघाडींच्या सत्तेमुळे राजकीय संतुलन साधले गेले असून, आगामी काळात स्थानिक विकासकामे आणि प्रशासनातील निर्णयांवर या आघाड्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरली असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही ती दिशा दाखवणारी ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेना शिंदे गटाने जयसिंगपूर, शिरोळ, मुरगुड आणि कुरुंदवाड या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदी विजय खेचून आणला आहे. पाठोपाठ भाजपने चंदगड, हुपरी आणि आजरा या तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. काँग्रेसला अवघ्या दोन ठिकाणी समाधान मानावे लागले असून पेठवडगाव आणि शिरोळ या ठिकाणी विजय मिळवला आहे. जनसुराज्यने पन्हाळा आणि मलकापूर नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गडहिंग्लज आणि कागलमध्ये विजय मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी; भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत केली गुलालाची उधळण

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीने नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही महायुतीचा घटक आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये मलकापूर आणि पन्हाळा नगरपरिषद नगराध्यक्ष पद खेचलं आहे.

मुश्रीफ-घाटगे आघाडीला मुरगूडमध्ये झटका

दुसरीकडे कागलच्या राजकारणामध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकत्र आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगली होती. कागलमध्ये दोघाना यश मिळालं असले, तरी मात्र मुरगुडमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या सुहासिनी देवी पाटील यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला. नगरपालिकेवर सत्ता सुद्धा मिळवली आहे. त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे यांना तगडा झटका बसल्याचे चित्र आहे.

आमदार अशोक माने यांच्या घराणेशाहीला विरोध

दुसरीकडे चंदगडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरल्याने मोठी चर्चा रंगली होती. त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला. शिरोळ नगरपालिकेमध्ये सुद्धा धक्कादायक निकालाची नोंद झाली असून आमदार अशोक माने यांच्या घराणेशाहीला मतदारांनी सपशेल नाकारलं. सूनबाई आणि मुलगा या दोघांना सुद्धा मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. त्यांचा पुतण्या सुद्धा निवडणुकीमध्ये पराभूत झाला. जयसिंगपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अजित पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे.

राजकारणातील घराणेशाही हद्दपार

नगरपंचायत निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. शिरोळ तालुक्यामध्ये आमदार अशोकराव माने यांना तगडा झटका बसला आहे. अशोकराव माने यांची घराणेशाही मतदाराने अक्षरशः हद्दपार केली आहे. त्यामुळे होम ग्राउंडवर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशोकराव माने यांची सून सारिका अरविंद माने यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये मुलगा अरविंद अशोकराव माने यांचा सुद्धा दारुण पराभव झाला. इतकेच नव्हे तर त्यांच्या पुतण्याला सुद्धा मतदारांनी घरचा रस्ता दाखवत एक प्रकारे घराणेशाही हद्दपार करून टाकली आहे. त्यामुळे भाजप ताराराणी आघाडीला सपशेल नाकारलं आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रचार केला होता. त्यामुळे शिरोळ नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सत्ता संपुष्टात आली आहे.

हे देखील वाचा : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी

पन्हाळा मलकापूरमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीत जनसुराज्यचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लक्षणीय यश मिळवताना जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड अशा चार ठिकाणी नगराध्यक्षपदी विजय खेचून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कागल आणि गडहिंग्लमध्ये अपेक्षित यश मिळालं आहे. मुरगुड नगरपालिकेमध्ये मतदारांनी हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीला नाकारत शिवसेना शिंदे गटाला कौल दिला आहे. या ठिकाणी सुहासिनीदेवी पाटील विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी पिछेहाट झाली असून एकाही जागेवरती विजय मिळालेला नाही. तीच स्थिती शिवसेना ठाकरे गटाची झाली आहे. काँग्रेस सुद्धा अवघ्या दोन ठिकाणी पेठवडगाव आणि शिरोळमध्ये विजय मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष कौल

  • एकूण जागा : १३
  • काँग्रेस : २ ( पेठ वडगाव, शिरोळ)
  • शिवसेना उबाठा- ०
  • राष्ट्रवादी शरद पवार- ०
  • मनसे – ०
  • जनसुराज्य – २ ( पन्हाळा, मलकापूर)
इतर स्थानिक आघाडी
  • भाजप : ३ ( चंदगड, हुपरी, भाजप )
  • शिवसेना शिंदे गट : ४ ( जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड)
  • राष्ट्रवादी : २ ( गडहिंग्लज, कागल
नगरपालिका नगराध्यक्ष
  • कुरुंदवाड : मनिषा डा़गे ( राजश्री शाहू आघाडी आघाडी)
  • जयसिंगपूर : संजय पाटील, यड्रावकर ( राजश्री शाहू आघाडी)
  • शिरोळ : योगिता कांबळे ( शाहू आघाडी)
  • पेठ वडगाव :  विद्या पोळ ( यादव आघाडी)
  • मलकापूर : रेशमा कोठावळे ( जनसुराज्य शक्ती पक्ष)
  • पन्हाळा : जयश्री पोवार ( जनसुराज्य शक्ती पक्ष)
  • हुपरी : मंगलराव माळगे ( भाजपा)
  • कागल : सविता माने (राष्ट्रवादी हसन मुश्रीफ गट)
  • मुरगूड : सुहासिनी पाटील ( भाजप)
  • गडहिंग्लज : महेश तुरंबमठ (भाजप )
नगरपंचायत नगराध्यक्ष
  • आजरा : अशोक चराठी
  • चंदगड: सुनील काणेकर (भाजपा)
  • हातकणंगले : अजितसिंह पाटील ( शिवसेना शिंदे गट)

Web Title: Kolhapur municipal council election results 2025 bjp and shinde shiv sena wins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • kolhapur
  • Kolhapur Politics
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Municiapl Election Result: ‘काँग्रेस’ भाजपची बी-टीम; निवडणुकीतील पराभवानंतर रोहित पवार संताप, राजकारण तापणार
1

Rohit Pawar on Municiapl Election Result: ‘काँग्रेस’ भाजपची बी-टीम; निवडणुकीतील पराभवानंतर रोहित पवार संताप, राजकारण तापणार

Pune Nagar parishad Result : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल
2

Pune Nagar parishad Result : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल

Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
3

Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान
4

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.