महामार्गाच्या कामासाठी यापूर्वी संपादित होणाऱ्या जमिनीला चौपट दराने भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, हा निर्णय शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासन दिले होते की, येणाऱ्या निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवू आणि सर्वांना न्याय देऊ. मात्र, महापालिका निवडणुकीत असं झालं नाही. आमच्यावर अन्याय झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींची नगरपालिका निवडणुकीतही महायुतीला ओवाळणी दिली आहे. महायुतीच्या घटक पक्षांचा विजय झाला असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये महिलांची सर्वाधिक संख्या म्हणजे लाख तब्बल ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत.
राज्यामध्ये दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे.
कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाचा मोठा उत्साह आहे. मात्र कागलमध्ये मतदान केंद्रावर तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे.
एकंदरीत, पक्षांची चिन्हे बाजूला पडून स्थानिक आघाड्यांची मोहर उमटलेली ही निवडणूक पूर्णपणे गावकुसातील राजकारणाच्या नव्या समीकरणांची कहाणीने निवडणूक रंगणार आहे.
अर्ज दाखल झालेल्या मध्ये गडहिंग्लज नगरपालिकेत सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक २७ अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी पन्हाळा आणि मलकापूर नगरपरिषदेत आले आहेत.
राजकीय पातळीवर या आरक्षणामुळे सर्वच पक्षांनी आता महिला नेतृत्वावर अधिक भर देण्याची गरज भासणार आहे. अनेक ठिकाणी पुरुष इच्छुकांना मागे हटावे लागणार असून महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची भेट घेत काँग्रेससोबत राहण्याची ग्वाही दिली. काँग्रेसची विचारधारा एकसंघपणे राधानगरी तालुक्यात पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यात, चांदी व्यवसाय, निधी बँक आणि दुबईमधील शेअर मार्केटसारख्या विविध उद्योगांमुळे संबंधित उद्योजकाच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती सातत्याने मोठी होत चालल्याचे समोर आले आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यात सामंजस्य घडवून आणत ही जागा भाजपकडे आली होती. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करत हळवणकरांनी आवाडेंना मदतीचा हात दिला होता.