चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी (संग्रहित फोटो)
चंदगड : नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर यांना विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यावेळी नगराध्यक्ष सुनील काणेकर आमदार शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत गुलालाची उधळण केली.
चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये भाजपचे सुनील सुभाष काणेकर (३९६७) दयानंद सुधाकर काणेकर, राजर्षी शाहू विकास आघाडी दयानंद सुधाकर काणेकर (२९५१) तर बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत अर्जुन कांबळे (५४) हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सुनील काणेकर हे एक हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले.
अपक्ष उमेदवार रोहित पिळणकर हे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. पिळणकर कुणाला पाठिंबा देणार त्यांचा हा निर्णय ठरणार असे उपस्थितीच्यात चर्चा सुरू होती. मात्र, निकाल लागल्या बरोबर त्यांनी आपला पाठिंबा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
गेल्या निवडणुकीत प्राची काणेकर विजयी
गेल्या निवडणुकीत नगराध्यक्षा प्राची दयानंद काणेकर या विजयी झाल्या होत्या. तर सुनील काणेकर यांच्या पत्नी समृद्धी यांचा पराभव झाला होता. त्याच मैदानात दोन दादांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत झाली. यामध्ये सुनील कानेकर हे विजयी झाले. त्यामुळे पत्नी हारल्या, मी जिंकलो आणि आमची फिटाफिट झाली.
हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व






