Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कानडी-मराठी वाद संपता संपेना; सीमाभागात कर्नाटक पोलिसांकडून रडीचा डाव

1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाभागात काळा दिन साजरा करीत निषेध फेरीचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव निपाणी खानापूर भागात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 01, 2025 | 02:29 PM
Kolhapur News : कानडी-मराठी वाद संपता संपेना; सीमाभागात कर्नाटक पोलिसांकडून रडीचा डाव
Follow Us
Close
Follow Us:
  • कानडी-मराठी वाद संपता संपेना
  • सीमाभागात कर्नाटक पोलिसांकडून रडीचा डाव
  • कोगनोळी चेक पोस्ट येथे पोलिस बंदोबस्त तैनात

गडहिंग्लज : 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाभागात काळा दिन साजरा करीत निषेध फेरीचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव निपाणी खानापूर भागात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांच्या दबाव तंत्रामुळे बेळगाव येथे वातावरण कमालीचे तापले आहे. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात येवू नये, यासाठी कोगनोळी चेक पोस्ट येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.दरमान महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागचे अध्यक्ष व युवा नेते शुभम शेळके यांना बेळगाव पोलिसांनी तब्बल 5 लाखाचा दंड ठोठावला आहे. अटक करता येईना म्हणून पोलिसांनी हा रडीचा डाव खेळला आहे.

Kolhapur News : कानडी-मराठी ‘सीमावाद’ आणखीनच चिघळला; मराठी भाषिकांचा एल्गार; काळा दिवस पाळणार

मात्र त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली असून पोलिसांनी ठोठावलेल्या दंडाविरोधात प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात अ‍ॅड. महेश बिर्जे यांनी आव्हान दिले आहे. म. ए. समितीचे नेते, कार्यकत्यांना प्रशासन येनकेन प्रकारे त्रास देते. आता तर त्यांनी भरमसाट दंड ठोठावण्याचा आदेश देऊन भारतीय घटनाच पायदळी तुडविली आहे. शेळके यांनी प्रतिबंधात्मक सूचनेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून बेळगाव माळमारुती पोलिसांच्या शिफारशीवरून कायदा व सुव्यवस्था विभाग उपायुक्तांनी तब्बल 5 लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे.

मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्षमनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांना नोटिसा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मध्यवर्ती समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन शांततेत सायकल फेरी काढण्यासंदर्भात चर्चा केली होती आणि काही वेळातच त्यांना या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे कितीही दबाव आणला तरी सीमा लढा सुरू ठेवला जाणारच, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1नोव्हेंबर रोजी राज्योत्सवाचीजोरदार तयारी सुरू आहे. शहरातील चौक, पुतळे यांची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आडकाठी आणण्याचा प्रयत्न, दबावतंत्राचा वापर

काळा दिनाच्या सायकल फेरीला सर्वस्तरातून पाठिंबा मिळू लागल्याने कर्नाटक पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर सुरू करण्यात आला आहे. म. ए. समितीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांकडून खबरदारीची नोटीस बजावली आहे. शांततेच्या मार्गाने काळादिनाची सायकल फेरी काढली जात असतानाही पोलिसांकडून नोटिसीद्वारे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्यवर्ती म. ए. समितीने धर्मवीर संभाजी उद्यानापासून2023-24 मध्ये सायकल फेरी काढली होती. अशा फेरीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असे कारण देत पोलिसांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी 5 लाखांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचा जामीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मार्केट पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांनी ही नोटीस बजावली आहे.

Kolhapur News : परतीच्या पावसाचा पिकांना धोका; शेतकरी वर्गाची तारांबळ

Web Title: Kolhapur news kannada marathi dispute not over karnataka police launch a sting operation in the border area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन; भाजपाकडून एकता पदयात्रेचं आयोजन 
1

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन; भाजपाकडून एकता पदयात्रेचं आयोजन 

Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप
2

Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा
3

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

Kolhapur News: कोल्हापूरला अवकाळी पावसाने सहा तास झोडपले; नागरिकांची उडाली तारांबळ
4

Kolhapur News: कोल्हापूरला अवकाळी पावसाने सहा तास झोडपले; नागरिकांची उडाली तारांबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.