Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : बाजारपेठेत गुळाला अच्छेदिन; राज्यासह परदेशातही होतेय मागणी

गूळ व्यवसायाला यंदाच्या हंगामात दिलासा मिळाल्याचे चित्र असून शेतकरी, गुऱ्हाळ चालक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 02, 2026 | 02:52 PM
Kolhapur News : बाजारपेठेत गुळाला अच्छेदिन; राज्यासह परदेशातही होतेय मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • बाजारपेठेत गुळाला अच्छेदिन
  • राज्यासह परदेशातही होतेय मागणी
गूळ व्यवसायाला यंदाच्या हंगामात दिलासा मिळाल्याचे चित्र असून शेतकरी, गुऱ्हाळ चालक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नियमितपणे सुरू असलेली गुऱ्हाळ घरे, पोषक हवामान आणि बाजारात मिळालेला समाधानकारक दर यामुळे यंदा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा सुमारे 2.21 लाख गूळ रव्यांची अधिक आवक नोंदवली गेली आहे. जानेवारी अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गतवर्षी कोल्हापूर बाजार समितीत 16 लाख 18 हजार 323 गूळ रव्यांची आवक झाली होती. त्या तुलनेत यंदा ही आवक वाढून 19 लाख 4 हजार 988 रव्यांपर्यंत पोहोचली आहे. ही वाढ जिल्ह्यातील ऊस उत्पादनात झालेली सुधारणा, गुऱ्हाळांची सातत्यपूर्ण कार्यरत स्थिती आणि बाजारातील मागणी यामुळे झाली आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व कागल या तालुक्यातून यंदा गूळ रव्यांची आवक झाली आहे.यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने समाधानकारक राहिल्यामुळे ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे गुऱ्हाळ हंगाम वेळेत सुरू झाला आणि तो सातत्याने सुरू राहिला. परिणामी गुळाचा पुरवठा नियमित राहिला. स्थानिक बाजारासह राज्यातील विविध भागांतून तसेच काही प्रमाणात, परराज्यातूनही कोल्हापूरच्या गुळाला मागणी असल्याचे चित्र आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशसह आखाती देशात कोल्हापूरचा गूळ पाठविला जातो.

Kolhapur News: केंद्र सरकारचे बजेट म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी; राजू शेट्टींची टिका

गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, वाढलेली आवक असूनही दर स्थिर राहणे आणि किंचित वाढ होणे ही बाब दिलासादायक आहे. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा दर काहीसा आधार देणारा ठरत आहे. मात्र, वाहतूक खर्च, मजुरी आणि इंधन दर वाढ याचा परिणाम नफ्यावर होत असल्याचीही शेतकऱ्यांची भावना आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व कागल या तालुक्यातून यंदा गूळ रव्यांची आवक झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने समाधानकारक राहिल्यामुळे ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे गुऱ्हाळ हंगाम वेळेत सुरू झाला आणि तो सातत्याने सुरू राहिला. परिणामी गुळाचा पुरवठा नियमित राहिला. स्थानिक बाजारासह राज्यातील विविध भागांतून तसेच काही प्रमाणात परराज्यातूनही कोल्हापूरच्या गुळाला मागणी असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व कागल या तालुक्यातून यंदा गूळ रव्यांची आवक झाली आहे.यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने समाधानकारक राहिल्यामुळे ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे गुऱ्हाळ हंगाम वेळेत सुरू झाला आणि तो सातत्याने सुरू राहिला. परिणामी गुळाचा पुरवठा नियमित। राहिला. स्थानिक बाजारासह राज्यातील विविध भागांतून तसेच काही प्रमाणात, परराज्यातूनही कोल्हापूरच्या गुळाला मागणी असल्याचे चित्र आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशसह आखाती देशात कोल्हापूरचा गूळ पाठविला जातो.गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, वाढलेली आवक असूनही दर स्थिर राहणे आणि किंचित वाढ होणे ही बाब दिलासादायक आहे. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा दर काहीसा आधार देणारा ठरत आहे. मात्र, वाहतूक खर्च, मजुरी आणि इंधन दर वाढ याचा परिणाम नफ्यावर होत असल्याचीही शेतकऱ्यांची भावना आहे.

दराच्या बाबतीतही यंदाचा हंगाम मागील वर्षापेक्षा काहीसा चांगला ठरला आहे. गतवर्षी गुळाचा सरासरी दर सुमारे 4 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका होता. यंदा त्यात वाढ होऊन सरासरी दर4,100 रुपये इतका राहिला आहे. दर्जेदार गुळाला याहून अधिक दरही मिळाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः रंग, चव आणि घट्टपणा चांगला असलेल्या गुळाला बाजारात चांगली मागणी आहे.

Kolhapur News : शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक; दर्जेदार ऊसबियाणे निर्मितीसाठीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Web Title: Kolhapur news jaggery is doing well in the market there is demand not only in the state but also abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अवकाळीचा पाथर्डीत कहर! दीड एकरातील लिंबू बाग उद्ध्वस्त
1

Ahilyanagar : अवकाळीचा पाथर्डीत कहर! दीड एकरातील लिंबू बाग उद्ध्वस्त

Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल
2

Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?
3

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?

Kolhapur Ambabai Temple : आई अंबाबाईच्या चरणी सूर्यकिरणे पोहोचणार थेट! गरुड मंडपाचा कायापालट
4

Kolhapur Ambabai Temple : आई अंबाबाईच्या चरणी सूर्यकिरणे पोहोचणार थेट! गरुड मंडपाचा कायापालट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.