Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात मोठी घटना; अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल

यंदाच्या नैसर्गिक हवामानाच्या बदलामुळे चालू हंगामात काजूचे पीकात मोठी घट झाली आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2026 | 06:04 PM
Kolhapur News : चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात मोठी घटना; अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल
Follow Us
Close
Follow Us:
  • चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात मोठी घटना
  • अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल
कोल्हापूर/ विजयकुमार कांबळे : चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक पैसा मिळवून देणारे आणि सोन्याच्या भावाप्रमाणे दिवसेंदिवस दरात वाढ होणारे पीक म्हणजे काजू उद्योग होय. मात्र यंदाच्या नैसर्गिक हवामानाच्या बदलामुळे चालू हंगामात काजूचे पीकात मोठी घट झाली आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मध्यंतरी पडलेल्या धुक्यामुळे काजू मोहोर करपून गेला आहे. तसेच किरकोळ प्रमाणात लागलेल्या काजू बिया आकाराने लहान असल्यामुळे वजनात घट झाली आहे. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी करत आहेत. दरवर्षी शेतकरी आपल्या मुला-मुलींचे लग्न कार्य, लक्ष्मी यात्रा, घरगुती कार्यक्रम करण्यासाठी काजूच्या पैशावर उलाढाल करत होते. परंतु यंदा काजूच्या घटत्या पीकामु‌ळे शेतकरी हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
काजू बिया बरोबरच काजूची बोंडे (मुरटा) वेळीच खरेदी विक्री होत नसल्याने काजूची बोंडे झाडाच्या सावलीत कुजून वाया जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या काजूच्या बोडांचा मद्यासाठी वापर केला जातो. दरवर्षी तालुक्यातील गावातून शेकडो टॅम्पो काजूची बोंडे भरुन गोव्याला जातात. मात्र या वर्षी गोव्यातील व्यावसायिक कमी प्रमाणात येत असल्याचे समजते.

Kolhapur News : प्रशासनाचे दुर्लक्ष, अपुऱ्या शिक्षकांवर अनेक वर्गाचा ताण; गगनबावडा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा

दराबाबत वाचा कोण फोडणार?
अवघ्या तीन ते चार महिण्याच्या कमी कालावधीत जादा उत्पादन आणि पैसा मिळवून देणारे पीक म्हणून या व्यवसायाकडे शेतकरी वळला आहे.ऊसाच्या पिकात शेतीच्या बांधावर तसेच खास करुन काजूचे पीकच फायदेशीर ठरते, म्हणून आपल्या चांगल्या व कसदार जमिनीमध्ये वैगुर्ला काजूच्या रोपांची महागड्या दराचा विचार नकरता खरेदी करुन ती रोपे लागवड करण्यात शेतकरी चळला आहे.दिवसेंदिवस काजूच्या व्यवसायाकडे शेतक-यांनी अधिक लक्ष दिले जात आहे. परंतु नैसर्गिक हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना यावा तोटा सहन करावा लागत आहे.

बाजार समितीचे सभापती आणि पदाधिकारी यानी शेतकऱ्यांच्या भात, नाचणी, मक्का, काजू आदी मालाच्या खरेदी विक्री कडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मालाला दराबाबत वाचा फोडणार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. व्यापाऱ्यांकडून मनमानी दराने खरेदीशिवाय व्यापारी शेतकऱ्यांचीवर्गाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची एकजूट आणि संघटना नसल्यामुळे व्यापारी आपली संघटना करुन मनमानी दर ठरवत आहेत. शेतकरी नाईलाजाने काजू बाजारात नेऊन विकत आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात असून वातावरणासह दराचाही फटका सहन करावा लागत आहे.

Sangali News : कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा; नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप

Web Title: Kolhapur news major incident in cashew production in chandgad taluka farmers are heartbroken due to economic collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.