Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Politics: कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच्या राजकारण तापणार

राजकीय दृष्ट्‌या महत्त्वाचा मानला जाणाऱ्या कागल तालुक्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर भाजपाचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटात अस्वस्थता पसरली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 22, 2025 | 04:26 PM
Kolhapur Politics: कोल्हापुरात‘घाटगे–मुश्रीफ विरुद्ध मंडलिक’सामना; कागलच्या राजकारण तापणार
Follow Us
Close
Follow Us:
  • नगरपालिका निवडणुकीसाठी विरोधी दोन्ही गट कागलमध्ये एकत्र
  • उमेदवारांना खबरदारी म्हणून अज्ञातस्थळी हलवलं
  • संजय घाटगे यांची समजूत काढण्यात यश
 Kolhapur News:  नगरपालिका निवडणुकीसाठी परस्पर विरोधी दोन्ही गट कागलमध्ये एकत्र आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या युतीचा किस्सा राज्यभर गाजला. मात्र मंत्री मुश्रीफांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा संपावा आणि घाटगे यांच्या मालमत्तेचे प्रकरण मिटावं, यासाठीच ही अनपेक्षित युती झाली असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली. त्यामुळं आता कागल आणि मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत घाटगे-मुश्रीफ विरुद्ध मंडलिक असा संघर्ष होणार असल्याची स्पष्ट चिन्ह आता दिसू लागली आहेत.

Shashi Tharoor News: ट्रम्प–ममदानी भेटीवरील थरूर यांची सोशल मीडिया पोस्ट; काँग्रेसच्या गोटात खळबळ

कागल नगरपालिकेसाठी दिलेल्या उमेदवारांना खबरदारी म्हणून अज्ञातस्थळी हलवण्यात आलं आहे. या उमेदवारांना आमिष आणि प्रलोभन दाखवू शकतात यासाठीच ही खबरदारी शिवसेनेकडून घेण्यात आली असल्याचे मंडलिक यांन सांगितले. ते म्हणाले, प्रत्यक्ष निवडणूक आणि प्रचाराला सुरुवात होईल, तेव्हा कागल आणि मुरगुड शहरातील जनताच या उमेदवारांच्या मागं खंबीरपणे उभी राहील. कागलच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर मी अस्वस्थ झालो, एकटा पडलो अशी टीका माझ्यावर झाली. मात्र या प्रसंगाने मी अधिक खंबीर झालो आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सदाशिवराव मंडलिक एकटे पडले, अशी चर्चा होती. त्यावेळी कोल्हापूरच्या जनतेने त्यांना उचलून धरलं. त्याचाच प्रत्यय कागल आणि मुरगुडच्या नगरपालिका निवडणुकीत येईल, असा विश्वासही मंडलिक यांनी व्यक्त केला.

Kolhapur News : महायुतीत गोंधळ; कागलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी

संजय घाटगे यांची समजूत काढण्यात यशस्वी

राजकीय दृष्ट्‌या महत्त्वाचा मानला जाणाऱ्या कागल तालुक्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर भाजपाचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटात अस्वस्थता पसरली होती. यावर मंत्री मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांची समजूत काढू असं वक्तव्य केलं होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संजय घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट झाली. दरम्यान, घाटगे पिता-पुत्रांनी आपण भाजपासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केलं असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ समजूत काढण्यात यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे.

 

Web Title: Kolhapur politics ghatge mushrif vs mandalik face off in kolhapur kagal politics will heat up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Kolhapur Election
  • Local Body Elections

संबंधित बातम्या

कागलच्या राजकारणाला कलाटणी; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार
1

कागलच्या राजकारणाला कलाटणी; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ
2

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ

जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर…; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन
3

जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर…; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.