Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur ZP Election 2026: गडहिंग्लजमध्ये महायुतीत सावळा गोंधळ राष्ट्रवादी-भाजपा आमने-सामने; महाविकास आघाडी बॅकफूटवर

चंदगडमधून काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांनी भाजपाशी मैत्री केली आहे. तर गेले एक दशकाहून अधिक कालावधी कुपेकर कुटुंबात राजकीय वारसदारावरून जुंपली होती. राजकीय संघर्ष बळावला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 25, 2026 | 10:49 AM
Kolhapur ZP Election 2026,Gadhinglaj Politics, Mahayuti Internal Conflict

Kolhapur ZP Election 2026,Gadhinglaj Politics, Mahayuti Internal Conflict

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग
  • काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजपात दाखल झाल्याने महाविकास आघाडी खिळखिळी
  • भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष बळावला
प्रा. सुनील देसाई, Kolhapur ZP Election 2026: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये इन्कमिंग वाढल्याने भाजपा भक्कम झाली असली तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्याने गडहिंग्लज उपविभागात महायुतीत सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपा व राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. ११ जिल्हा परिषदेच्या गटात नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माघारी नंतर स्पष्ट चित्र होणार असले तरी गडहिंग्लज उपविभागात महायुतीचे प्राबल्य वाढले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष बळावला आहे.

गडहिंग्लज उपविभागातील आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उलथापालथी झाल्या. महायुतीत बेबनाव वाढल्याचे चित्र आहे. भाजपामध्ये इन्कमिंग वाढले आहे. तर काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजपात दाखल झाल्याने महाविकास आघाडी खिळखिळी झाली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता अधिक संख्येने मिळवण्यासाठी गडहिंग्लज विभागात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच आहे. महायुतीतील हा सावळा गोंधळ कुणाच्या पथ्यावर पडणार? याबद्दल अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. माघारीनंतर लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी महायुतीतील सावळा गोंधळाचा फटका नेमका कुणाला बसणार? याबद्दल उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

IND vs NZ 3rd T20 Pitch Report : कशी असेल गुवाहाटीतील खेळपट्टीची स्थिती, धावांचा पाऊस पडेल की गोलंदाजांना होणार मदत?

महायुतीमधील घटक पक्षांची कोअर कमिटी कार्यरत असली तरी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. त्यातून नऊ जिल्हा परिषद गटात भाजपा राष्ट्रवादी आमने-सामने उभी ठाकली आहे. गडहिंग्लज उपविभागात महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात एकमत झाले नसल्याने काही ठिकाणी परस्परविरोधी उमेदवार रिंगणात आहेत.

चंदगड आजरा व गडहिंग्लज तालुक्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपा, जनता दल, शिवसेना शिंदे गट एकत्रित आले होते. यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी पुढाकार घेतला होता. जनता दलाच्या नेत्या प्रा. स्वाती शिंदे कोरी यांनी गडहिंग्लज नगरपालिकेत भाजपाबरोबर युती केली होती. त्यांना केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल कार्यकर्त्यांनी भाजपा बरोबर युती करून निवडणूक लढवावी, असा अट्टाहास केला. मात्र वरिष्ठ पातळीवरून राजकीय घडामोडी घडल्या. आणि जनता दलाच्या नेत्या स्वाती शिंदे कोरी भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत.

दुसरीकडे चंदगडमधून काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांनी भाजपाशी मैत्री केली आहे. तर गेले एक दशकाहून अधिक कालावधी कुपेकर कुटुंबात राजकीय वारसदारावरून जुंपली होती. राजकीय संघर्ष बळावला होता. अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून बाबा कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदा कुपेकर बाभुळकर व त्यांचे चुलत भाऊ भाजपातून संग्रामसिंह कुपेकर देसाई यांनी मतभेद बाजूला ठेवत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संग्रामसिंह कुपेकर यांना नेसरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देखील जाहीर झाली आहे.

गडहिंग्लज उपविभागात माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या डॉ. नंदा बाभुळकर कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन जिल्हा परिषद निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल, गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड, आजऱ्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन करण्यावर भर दिला आहे. या अंतर्गत उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघ मुश्रीफ यांनी आपल्याकडे घेतला आहे. तर गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघ देखील आपल्याकडे घेतला आहे.

Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल

भाजपाला इन्कमिंगचा फायदा होणार का?

गडहिंग्लज उपविभागात माजी राज्यमंत्री भरमु पाटील व आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपाचे उत्तम संघटन केले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून विनायक तथा आप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे नेसरीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, जयकुमार मुन्नोळी यांचे भाजपात इन्कमिंग झाले. त्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाकडे वळले आहेत.

शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार

महायुतीच्या कोअर कमिटी बैठकीत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित येऊन लढण्याचा निर्धार केला होता. मात्र त्याला गडहिंग्लज उपविभाग अपवाद ठरला आहे. या उपविभागात भाजपा, राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकले आहेत. या शिवसेना शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यात देखील अंतर्गत धुसफूस असल्याने हा संघर्ष कुणाच्या पथ्यावर पडणार? याबद्दल विविध आडाखे बांधले जात आहेत.

राष्ट्रवादीची मदार पाटील- बाभुळकर

कागल गडहिंग्लज विधानसभा मतदार क्षेत्रातील गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेला आपले अधिक समर्थक निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. चंदगड गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातून सर्वच्या सर्व नऊ जिल्हा परिषद गटाच्या जागा भाजपाच्या निवडून आणण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी कंबर कसली आहे. गडहिंग्लज उपविभागात दोन्ही राष्ट्रवादीची मदार माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदा बाभुळकर कुपेकर यांच्यावर आहे. मिनी मंत्रालयाच्या या निवडणुकीत महायुतीतील भाजपा की राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार? हे स्पष्ट होणार आहे. महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे.

 

 

Web Title: Kolhapur zp election 2026 confusion reigns in the mahayuti alliance with bjp and ncp facing off against each other in the gadhinglaj subdivision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • Maharashtra Zilla Parishads Election

संबंधित बातम्या

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
1

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल
2

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल

ZP Election 2026 : कोल्हापुरात रणसंग्राम; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चिन्हे,जनता दल, भाजपा युतीचे संकेत
3

ZP Election 2026 : कोल्हापुरात रणसंग्राम; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चिन्हे,जनता दल, भाजपा युतीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.