काय नेमकं घडलं?
मारहाण झालेल्या तरुणाचे नाव नितीन कल्याण लोंढे (३२) असे आहे. नितीन हे गावातील सतीश यांच्या हॉटेलवर मोमीन पठाण यांना तुमच्या मुलाने आमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात काल सायंकाळी येऊन धिंगाणा केला असे सांगण्यासाठी गेले होते. यावेळी रोहित तुळशीदास गायकवाड, शुभम आण्णा लोंढे, आसिफ मोमीन शेख, साहिल मोमीन पठाण या चौघांनी नितीन लोंढे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मंगळवार रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारहाण करत हातावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच उजव्या बाजूच्या बरगडीवर जबर मारहाण केली आहे.
यानंतर नितीन लोंढे यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या चार जणांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहेत.
पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; बीड येथील घटना
बीड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि सासूच्या मानसिक त्रासला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. ही घटना बीडच्या केजमध्ये घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनने परिसर हादरून गेले आहे.
काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव उत्तम शिवाजी जाधव असे आहे. तर त्यांच्या पत्नीचं नाव मनीषा जाधव असे आहे. मनीषाचे मयूर पाटील-देशमुख नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. मयूरने तिला व तिच्या दोन मुलांना भाडेतत्वावर घर घेऊन दिले होते, त्याच ठिकाणी ते राहत होते. १९ जानेवारीला घटनेच्या दिवशी उत्तम हा मनीषा राहत असलेल्या घरी गेला. तेव्हा मयूर आणि मनिषाने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि पळवून लावले. एवढेच नाही तर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
सासू मंगला भारत खाडे, पत्नी मनिषा, प्रियकर मयूर देशमुख पाटील यांच्या त्रासाला कंटाळून उत्तम जाधवने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. हाउसिंग कॉलनी केज येथे राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत जीवन संपवलं. याप्रकरणी आरोपींवर केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Ans: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी गावात.
Ans: वाढदिवसाच्या कार्यक्रमातील वादावरून शुल्लक कारणातून हल्ला करण्यात आला.
Ans: आष्टी शहरात, मुख्य रस्त्यावर सिनेस्टाईल मंगळसूत्र चोरी झाली.






