Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“रतन टाटा बटाटा वडा सेंटर…. “; व्यायसायिकांनी दिली हटके मानवंदना, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

उद्योगपती रतन टाटा यांना कोल्हापुरकरांना हटक्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 21, 2024 | 06:58 PM
"रतन टाटा बटाटा वडा सेंटर.... "; व्यायसायिकांनी दिली हटके मानवंदना, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

"रतन टाटा बटाटा वडा सेंटर.... "; व्यायसायिकांनी दिली हटके मानवंदना, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने फक्त भारतच नाही तर विदेशात ही शोक व्यक्त करण्यात आला होता. रतन टाटा हे एक असं व्यक्तीमत्त्व होतं की करोडपती आणि सामान्य माणसांना देखील त्यांच्याबद्दल आदर वाटायचा. टाटांच्या जाण्याने भारतीय उद्योग विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. टाटा फक्त उद्योगपतीच नव्हते तर समाजासाठी देखील त्यांनी मोलाचं कार्य केलं होतं. कोविड काळात गरजूंना आणि डॉक्टरांना  ताज हॉटेलमधून नाश्ता आणि कोरड्या खाऊचे पॅकेट्स जात असतं तेही मोफत. अशा या संवेदनशील उद्योगपतीच्या जाण्याने सामान्य गोरगरीब जनता देखील हळहळली.

हेही वाचा-महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या पिढीचा प्रवेश, दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवंडांना भाजपने दिलं तिकीट

सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांनी टाटांना श्रद्धांजली वाहिली तर कोणी रील्स करत कलेतून श्रद्धांजली वाहिली. अशातच  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोल्हापूरमधील असल्याचं म्हटलं जातं. रतन टाटा हे प्रत्येक भारतीयांचं प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून हीच प्रेरणा घेत कोल्हापुरातले तरुण उद्योजक एकत्र येत टाटांना हटक्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. गंगावेश चौक या परिसरातील व्यापाऱ्यांनी आपआपल्या दुकानांच्या बाहेर रतन टाटांच्या नावाचा बोर्ड लावला आहे. जसं की, रतन टाटा बटाटे वडा सेंटर, रतन टाटा ज्युस सेंटर असं नाव देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. टाटांना मानवंदना देताना या प्रत्येकाच्या बोर्डवर असलेल्या मजकूराने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. बोर्डवर लिहिलं होतं की, “स्वर्गीय रतनजी टाटा यांना मानवंदना प्रीत्यर्थ”असा सामायिक मजकूर लिहिलेला होता. या मजकूराच्या पुढे प्रत्येकाच्या व्ययसायाचं नाव लिहिण्यात आलं होतं.

 

हेही वाचा-कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उदंड प्रतिसाद; डोंबिवली बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा निर्धार

उद्योग जगतात टाटांनी भारतासाठी अमुलाग्र कार्य केलं आहे. याच जाणिवेतून संपूर्ण भारतीय आज त्यांना मानवंदना देत आहेत. जीवंतपणी नाही पण निदान त्यांच्या मृत्यूपश्चात तरी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा  अशी मागणी समस्त भारतीयांच्या वतीने करण्यात येत आहे. आज प्रत्येक होतकरु तरुणांना रतन टाटांच्या विचारांनी आणि त्यांच्या नम्र स्वभावाने प्रभावित केलं आहे. “करायला गेलं तर सगळं शक्य़ आहे. निर्णय कधीही चूक किंवा बरोबर नसतो. घेतलेला निर्णय योग्य कसा ठरेल हे आपण आपल्या कामातून सिद्ध करायचं असतं” असा करियरचा मूलमंत्र रतन टाटांनी देशाला दिला आहे. याच आदर्श उद्योगपतीला देशवासियांनी मानवंदना दिली आहे.

Web Title: All local businessman unique tribute for ratan tata in kolapour this video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 06:56 PM

Topics:  

  • kolhapur
  • Ratan Tata

संबंधित बातम्या

राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट; अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा
1

राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट; अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्
2

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

TATA Trust Controversy : टाटा समूहात घराणेशाहीचा वाद! नेव्हिल टाटांच्या नियुक्तीवरून ‘टाटा ट्रस्ट’मध्ये मतभेद
3

TATA Trust Controversy : टाटा समूहात घराणेशाहीचा वाद! नेव्हिल टाटांच्या नियुक्तीवरून ‘टाटा ट्रस्ट’मध्ये मतभेद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.