कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उदंड प्रतिसाद; डोंबिवली बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा निर्धार
डोंबिवली: विधानसभा निवडणूक जाहिर झाल्या आहेत. त्यासाठी पक्षाला विजयश्री मिळवून देण्यासाठी भाजपचे शेकडो सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी जिल्हाद्यक्ष ज्यांनी कल्याण, डोंबिवलीसह जिल्ह्यात भाजप रुजवला, वाढवला अशा सगळ्यांची डोंबिवलीत ब्राह्मण सभा येथे रविवारी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी डोंबिवली बालेकिल्ला अभेद्य राहील असा निर्धार त्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी केला.
भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की, जिथे कार्यकर्त्यांचा सन्मान होतो. कै. रामभाऊ म्हाळगी, दिवंगत नायब राज्यपाल राम कापसे, स्व. दिगंबर विशे सर, स्व.संत सर,स्व.कांतबाबू आपले मा. मंत्री जगन्नाथ पाटील, संजय केळकर, पद्माकर कुलकर्णी (पदू काका), , यांच्यासह के आर जाधवजी, शशिकांत कांबळे, विद्यमान अद्यक्ष नाना सूर्यवंशी आदींस पक्षासाठी योगदान खूप मोलाचे आहे.या सगळ्यांनी पक्षाला बळकटी दिली. शून्यातून पक्ष उभा केला. त्यांच्यामुळे आता पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत, त्यांच्या कष्ट, पक्षाविषयी प्रेम, आदर, आपुलकी, एकीला माझा सॅल्युट अशा शब्दात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ मंडळींचे योगदानाबद्दल आदर व्यक्त केला.
हेही वाचा-“तरुणांच्या रोजगारासह महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहू”; योगेश कदम यांची ग्वाही
चव्हाण पुढे असंही म्हणाले की, वेळी ही सगळी मंडळी झटत होती तो काळ प्रतिकूल परिस्थितीचा होता, हे इतिहास सांगतो. आता बऱ्याच प्रमाणात अनुकूल दिवस आले असून प्रतिकुल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची ताकद या ज्येष्ठ मंडळींमध्ये आहे. त्यांनी अपार मेहनत घेऊन, एकेक कार्यकर्ता पक्षात कसा टिकून राहील याची काळजी घेतली.त्यांनी लावलेल्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे, त्या सगळ्यांची मेहनत आता कामाला येत आहे असेही चव्हाण म्हणाले.
हेही वाचा- निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट; ‘या’ मतदारसंघासाठी
कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. पन्नासहुन अधिक वर्ष होऊनही त्यांचे पक्षाबद्दल असलेले अपार प्रेम, आपुलकी पाहून मनाला उभारी मिळते, एकेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता हे ऊर्जा, स्फूर्तिस्थान आहे. आताच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्याकडून बरच शिकण्यासारखे आहे. ही ऊर्जा स्थान आहेत म्हणूनच आपण सगळे कार्यरत आहोत, त्या सगळ्यानी मला वेळोवेळी सहकार्य केले आहे त्या सगळ्यांचा मी ऋणी असल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले.
मंत्री चव्हाण यांनी मेळाव्याची सांगता करताना डोंबिवलीतील भाजपाच्या जागांबद्दल सांगितले आहे. चव्हाण म्हणाले की, पुन्हा एकदा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी सगळ्यांनी आशीर्वाद दिले असून शतप्रतिशद भाजप असे सांगून मला बळकटी दिली आहे.