
कोल्हापुरी चपलांची जागतिक कीर्ती!
या उपक्रमाद्वारे पारंपारिक कोल्हापुरी चप्पलनिर्मिती आणि प्राडाचे आधुनिक, समकालीन डिझाइन्स यांचा संगम घडवून आणला जाणार आहे. तयार होणाऱ्या विशेष कलेक्शनची विक्री फेब्रुवारी २०२६ पासून प्राडाच्या जगभरातील ४० स्टोअर्समध्ये व त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल.
या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे मोठे पाठबळ मिळाले. कराराची अंमलबजावणी प्रधान सचिव आणि लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले,”या भागीदारीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो कारागिरांना प्रशिक्षण, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल. भारतीय कारागिरांचा वारसा जागतिक स्तरावर अधिक दृढ होणार आहे.”
लिडकॉमच्या एमडी प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, “जागतिक ब्रँड थेट आपल्या पारंपारिक कारागिरांसोबत काम करत असल्याने त्यांचे कौशल्य योग्य मान मिळवेल. पिढ्यानपिढ्या चालत आलेली कोल्हापुरी परंपरा या प्रकल्पातून जगासमोर उभी राहील.”
लिडकारच्या एमडी डॉ. के. एम. वसुंधरा यांनी सांगितले, “या सहकार्यामुळे प्रशिक्षण, रोजगार आणि जागतिक संधींची मोठी दारे उघडतील. कोल्हापुरी चपलांचा वारसा हा महाराष्ट्र–कर्नाटकातील कारागिरांचा शतकांपासूनचा अभिमान आहे.”
Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर
प्राडा समूहाच्या CSR प्रमुख लोरेंझो बर्टेली म्हणाले, “ही भागीदारी भारतीय कारागिरीला जागतिक मंचावर योग्य स्थान देईल. आम्ही ‘Made in India, Inspired by Kolhapuri’ या दृष्टीकोनाशी बांधील आहोत.”
कोल्हापुरी चप्पल निर्मिती महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातील बेळगावी, बागलकोट, धारवाड, विजापूर या आठ जिल्ह्यांत होते. २०१९ मध्ये त्यांना GI टॅग मिळाला, ज्यामुळे अस्सलता आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.