प्रस्तावित कॉरिडॉरसाठी पंढरपुरातील सर्व्हेचे काम पूर्ण; ७० टक्के मालमत्ताधारकांचा सकारात्मक प्रतिसाद
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या (विकास आराखडा) सर्व्हेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. चार दिवसांच्या सव्र्व्हेमध्ये मंदिर परिसरातील ६४२ संभाव्य बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांची माहिती संकलित करण्यात आली. यामध्ये तब्बल ५१० मालमत्ताधारकांनी प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य केले आहे. तर केवळ १३२ मालमत्ताधारकांनी माहिती भरून देण्यास नकार दिला आहे. सव्र्व्हेतील माहिती देणाऱ्या मालमत्ताधारकांची आकडेवारी पाहता सुमारे ७० टक्के मालमत्ताधारकांची कॉरिडॉरविषयी सकारात्मक भूमिका असल्याचे यातून समोर आले आहे. आता विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती मिळणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात कॉरिडॉर केला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
घोणणा होतात तत्काळ प्रशासकीय पातळीवर तयारी देखील सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांची माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अलीकडेच जिल्हाधिकारी कुमार आशीवांद यांनी पंढरपुरात येऊन मंदिर परिसरातील दुकानदार, व्यापारी, रहिवासी आणि महाराज मंडळींसोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. विकास आराखड्याबाबत त्यांची मते जाणून घेतली होती. विकास आराखडा तयार करण्यापूर्वी मंदिर परिसरातील दुकानदार, रहिवासी यांची आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक सव्हें करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ८ ते ११ मे दरम्यान मंदिर परिसरातील मालमत्ताधारकांचा एक सव्व्हे करण्यात आला. सुरवातीला काही लोकांनी सव्र्व्हेला विरोध केला होता. परंतु नंतर बहुतांश मालमत्ताधारकांनी आपली संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली आहे. वेळेत माहिती संकलित झाल्यामुळे विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.
सलग चार दिवस माहिती संकलन
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नगरपालिका कर्मचाऱ्याऱ्यांनी सलग चार दिवसांमध्ये मंदिर परिसरातील ६४२ संभाव्य बाधितांच्या घरोघरी जाऊन माहिती संकलित केली, यामध्ये ५१० मालमत्ताधारकांनी आपली माहिती देऊन कॉरिडॉरबाबत सकारात्मका भूमिका घेतली आहे. तर केवळ १३२ लोकांनी माहिती दिली नाही. यामध्ये बहुतांश लोकांनी कॉरिडॉरविषयी सरकारला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित लोकही प्रशासनाला सहकार्य करतील, अशी अपेक्षा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी व्यक्त केली आहे.
आषाढी यात्रेपूर्वी आराखड्याचे काम
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावर कॉरिडॉरची खास जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विकास आराखडा तयार करण्याचे काम आता सोपे होणार आहे. तत्काळ विकास आराखडा तयार करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश आहेत. आषाढीपूर्वी कॉरिडॉरचा अंतिम विकास आराख्खता तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.