
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे रंगणार दिमाखदार यात्रोत्सव
प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी
यात्रा कमिटीकडून सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष
देवगड: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची वार्षिक यात्रा यंदा १५ ते १७फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात व दिमाखात सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. १७फेब्रुवारी रोजी ‘दर्श अमावस्या’ असल्याने तीर्थस्नान व देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत तसेच प्रशासकीय यंत्रणांकडून तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संतोष लाड, संजय वासुदेव वाळके, मंगेश पेडणेकर, दीपक घाडी आदी उपस्थित होते.
यात्रा कमिटीकडून सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष
भाविकांच्या सोयीसाठी भव्य मंडप व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरता येतील असे पर्यायी रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी मजबूत बॅरिकेडिंग व रेलिंग बसविण्यात आले असून, भाविकांसाठी दर्जेदार ‘गुळ-बुंदी लाडू’ प्रसाद विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान चोऱ्या व छडछाडाच्या घटना टाळण्यासाठी मादर व परिसरात जम्बो कॅमेऱ्याऱ्यांसह सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात आले आहे. स्वयंसेवकांचे भरारी पथक तसेच समुद्रकिनारी सागरी सुरक्षा दल तैनात असणार आहे. देवगड महाविद्यालयाचे १०० प्रशिक्षित विद्यार्थी स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व शोध-बचाव कार्यात प्रशासनाला मदत करणार आहेत.
गड्या आता जावं लागतंय! बाली, थायलंड सोडा अन् स्वर्गात या; ‘हा’ जिल्हा Tourism मध्ये…
देवगड-मिठमुंबरी-तारामुंबरी पुलामार्गे समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एमटीडीसीच्या जागेत पार्किंगसाठी सपाटीकरण करण्याच्या सूचनांवर अद्याप कार्यवाही न झाल्याने यात्रेदरम्यान वाहतूक कोंडीची भीती व्यक्त होत आहे.
पर्यावरणपूरक यात्रा
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर कमानी व राजकीय बॅनर्स लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच यात्रा पूर्णपणे प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, व्यापारी व पूजा साहित्य विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. यात्रेचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यात व राज्यात एलईडी स्क्रीनद्वारे दाखवण्यात येणार आहे. यंदा यात्रेसाठी पाच देवस्वाऱ्यांची नोंद झाली असून, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे आगमन होणार आहे. या कालावधीत गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांनी शक्यतो दिवसा दर्शन घ्यावे तसेच सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.