Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगे पाटलांच्या गावात लक्ष्मण हाकेंवर दगडफेक; बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडचे वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या गावामध्ये लक्ष्मण हाके यांच्या यात्रेवर दगडफेक करण्यात आली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 28, 2024 | 12:28 PM
मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये लक्ष्मण हाकेंवर दगडफेक

मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये लक्ष्मण हाकेंवर दगडफेक

Follow Us
Follow Us:

बीड : राज्यामध्ये मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरुन तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आऱक्षण ओबीसीमधून घेण्याबाबत आग्रही आहेत. तर मराठा समाजा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. हाके यांनी 10 दिवस उपोषण देखील केले. शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनंतर हाके यांनी आपले उपोषण स्थगित केले आहेत. तसेच महाएल्गार यात्रा घेत अभिवादन करत आहे. दरम्यान, बीडमधील मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये लक्ष्मण हाके यांच्या यात्रेवर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे वातावरण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण हाके यांनी सिंदखेडराजा येथून त्यांच्या यात्रेला सुरुवात केली. यानंतर त्यांची यात्रा बीड जिल्ह्यातील कासार तालुक्यातील मातोरी गावात आलेले असताना बसस्टॅँडवर दगडफेक झाली. या घटनेत काहीजण जखमी असल्याचे माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडे डीजेसह अनेक उपकरणे होते. प्राथमिक वृत्तानुसार डीजे वाजवण्यावरून दोन गट आमने सामने आले. यावेळी मातोरी येथील बसस्टॅण्डवर दगडफेक देखील झाली. या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे पोलिसांकडून अधिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. यासंदर्भात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही एक्स पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

 

बीडमधील या प्रकारानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लक्ष असल्याचे सांगितले आहे. मुंडे यांनी लिहिले आहे की, “बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये…” असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Lakshman hake reached manoj jarang patil village stone pelting atmosphere of tension in matori beed nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 12:28 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • OBC Laxman Hake
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

ओबीसी आरक्षणासाठी पंचमसाली समाजाचा अक्कलकोटमध्ये मेळावा; जगद्गुरू बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक
1

ओबीसी आरक्षणासाठी पंचमसाली समाजाचा अक्कलकोटमध्ये मेळावा; जगद्गुरू बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
2

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.