Lalbagh Raja Mandal Defamation claim filed against Koli Hiralal Wadkar in Mumbai High Court
Lalbagh Raja Mandal Defamation claim filed in Mumbai HC : मुंबई : गणेशोत्सवाची सांगता झाली असून गणरायाचे विर्सजन पार पडले आहे. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणुकांची सर्वत्र जोरदार चर्चा असते. पण यंदा सर्वात जास्त चर्चेत राहिला म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा. लालबागचा राजाच्या दर्शनावरुन अनेकदा वाद निर्माण होत असतात. पण यंदा विसर्जनाला 33 तास लागल्यामुळे सर्व स्तरावर जोरदार टीका करण्यात आली. समुद्राच्या भरती मुळे लालबागच्या राजाचे विसर्जन खोळंबले. याबाबत गिरगाव चौपटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे लालबाग राजा मंडळ त्यांना कोर्टामध्ये खेचणार आहे.
यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन मोठा चर्चेचा विषय ठरला. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल देखील झाला होता. मात्र विसर्जन न झाल्यामुळे अनेक तास गणपती कंबरेएवढ्या पाण्यामध्ये राहिला. यामुळे मंडळावर जोरदार टीका देखील झाली. यामध्ये गुजरातवरुन आणलेला तराफा असल्यामुळे मूर्तीचे विसर्जन उशीरा झाले असा दावा गिरगाव चौपटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी केला होता. यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका देखील करण्यात आली. अनेकांनी हिरालाल वाडकर यांच्या व्हिडिओचा दाखला देत कोळी बांधवांऐवजी गुजरातवरुन ताफा आणल्यामुळे विसर्जन रखडल्याचा दावा करण्यात आला. यामुळे लालबाग मंडळाकडून हिरालाल वाडकर यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत लालबाग राजा मंडळाकडून हिरालाल वाडकर यांच्याशी कोणाताही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांनी कधीच लालबागच्या राजाचे विसर्जन देखील केलेले नाही. केवळ यातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि बदनामीच्या हेतून व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे मत लालबाग राजा मंडळाकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता लालबागच्या राजाचा मंडळाचा विसर्जनाचा वाद कोर्टामध्ये पोहचणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गुजरातचा तराफा आल्यामुळे हे…
हिरालाल वाडकर यांनी म्हटले की, “आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षापासून लालबाग राजाचे विसर्जन करत आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिले आणि गणित चुकले, अशी प्रतिक्रिया माध्यमांमध्ये हिरालाल वाडकर यानी दिली होती. भरती ओहीटीचा अंदाज लालबागच्या मंडळाला आला नाही. आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो आहोत. गुजरातचा तराफा आल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी त्यांना दिलेले आहे. यापुढी मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी,” अशी प्रतिक्रिया हिरालाल वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. आता हिरालाल वाडकर यांच्या या वक्तव्याविरोधात लालबाग राजा मंडळाने कोर्टात अबू नुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.