पुण्यातील आयुष कोमकरची हत्या प्रकरणात आंदेकर टोळीच्या सात जणांना अटक
नक्की झालं काय? रोहित शर्मा रात्री उशिरा का पोहोचला हाॅस्पिटलमध्ये? चाहते चिंतेत; Video Viral
आयुष कोमकर खून प्रकरणी आंदेकर टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह सहा आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये आंदेकर कुटुंबातील चार जणांचा समावेश असून दोन जण बाहेरील असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. सध्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी सुरू असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा शुक्रवारी नाना पेठेत दोन तरुणांनी गोळ्या झाडून खून केला. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी वनराज आंदेकरचा वडील सूर्यकांत आंदेकर याच्यासह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. तर काल मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पथकाने सूर्यकांत आंदेकर आणि त्याच्या काही साथीदारांना बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून, पुढील कार्यवाहीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?
आयुष कोमकर खून प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली आहे. मेहकर तालुक्याजवळील एका गावाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींमध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश असून इतर दोन जणांचीही नावे समोर आली आहेत. सर्वांना पुण्यात आणून पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी सुरू केली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.






