सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या दरवाढीने आर्थिक कोंडी
Latur News: लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाच महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल, भाजीपाल्याच्या किमतीत वाढ होत असल्याने घरखर्चाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. एकीकडे पावसाची कमतरता, शेतीसमोरील संकट, तर दुसरीकडे वाढत्या महागाईचा भार यामुळे सामान्य कुटुंबांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. महागाईचा दर ४.६३ ५.४८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची आकडेवारी समोर आली टक्क्यांवरून आहे. भाज्या आणि अन्नधान्याच्या किमतीतील वाढ हे महागाईमागील प्रमुख कारण मानले जात आहे.(फोटो सौजन्य – AI)
शिष म्हणजे, सरकारच्या देखरेखीखाली असलेल्या ४२ जीवनावश्यक वस्तूंपैकी ४१ वस्तूंच्या किमतीत गेल्या वर्षभरात वाढ झाल्याचे चित्र आहे. बाजारात डाळींच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. चणाडाळीचा दर १०० रुपये, मूगडाळ १३० रुपये, तूरडाळ १५० रुपये, चवळी डाळ पोहोचल्याचे चित्र आहे. डाळीसोबतच ज्वारी, बाजरी, १४० रुपये, तर मसूर डाळ १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत तांदूळ आणि गहू यांच्या दरातही वाढ झाल्याने दैनंदिन आहाराचा खर्च वाढला आहे. गहू आणि लोकवन गव्हाचे दर प्रतिकिलो ३५ रुपयांच्या आसपास असल्याने कुटुंबांच्या महिन्याच्या किराणा खर्चात वाढ होत आहे.
कांद्याबरोबरच सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेल यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील खर्च आणखी वाढला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवामुळे फळे आणि उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची मागणी वाढली आहे. साबुदाणा, शेंगदाणे, भगर आदी पदार्थांचे दर वाढल्याने उपवास करणाऱ्या नागरिकांनाही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. फळांच्या किमतीत वाढ झाल्याने सणासुदीच्या काळातील खर्चाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.
पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. पिकांचे उत्पादन घटल्यास त्याच्या किमती आणखी वाढू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. महागाईचा सर्वाधिक फटका कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना बसत आहे. घरखर्च, किराणा, भाजीपाला, शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी अधिक रक्कम खर्च करावी लागत असल्याने बचतीवर परिणाम होत आहे.
Ans: सणासुदीच्या काळात किराणा, कडधान्ये, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यास घरखर्चाचे बजेट बिघडू शकते.
Ans: तूरडाळ, मूगडाळ, हरभरा आणि इतर कडधान्ये ही प्रथिनांचे महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यांच्या किमती वाढल्यास मासिक किराणा खर्च वाढतो आणि मर्यादित बजेटमध्ये पौष्टिक आहाराचे नियोजन करणे कठीण होऊ शकते.
Ans: अतिवृष्टी, कमी पाऊस, उष्णतेची लाट, पिकांचे नुकसान, आवक कमी होणे, वाहतूक खर्च आणि बाजारातील मागणी-पुरवठ्यातील बदल यांमुळे भाजीपाल्याच्या किमती वाढू शकतात.






