Laxman Pawar, a soldier from Solapur, was martyred in West Bengal.
अकलूज : भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना एक जवान निधन पावले आहेत. जवान लक्ष्मण संजय पवार यांच्या पार्थिवावर आज (दि.16 मे) रोजी गिरझणी येथील स्मशानभूमीत शासकीय इतममात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी ‘जवान लक्ष्मण पवार अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. माळशिरस तालुक्यातील गिरझणी (इलाक्षीदेवीनगर) येथील रहिवासी असलेले जवान लक्ष्मण संजय पवार यांचा दुर्दैवी झाला आहे. ते पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे भारतीय सैन्य दलात नायक रँक पदावर कर्तव्य बजावत असताना जवान लक्ष्मण संजय पवार वय 33 यांचे दि.13 मे रोजी पश्चिम बंगाल येथे त्यांचे निधन झाले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आज शुक्रवार (दि.16 मे) रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव अकलूज येथे आणण्यात आले. अकलूजच्या महर्षी चौकापासून ते गिरझणी पर्यंत सजवलेल्या रथावर जवान लक्ष्मण पवार यांचे तिरंग्यासह पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेमध्ये माजी सैनिकांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. रस्त्यावर दुतर्फा उभ्या राहिलेल्या नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी करत आणि पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
त्यानंतर जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी त्यांचे आई,वडील,भाऊ बहिण यांना शोक अनावर होऊन हंबरडा फोडला. यावेळी सर्व नातेवाईक व उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. काही वेळ पार्थिव अत्यंदर्शनासाठी घरासमोर ठेवण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांनी अत्यंदर्शन घेतले. राहत्या घरापासून अत्यंयात्रा काढून गिरझणी येथील स्मशानभूमीत जवान लक्ष्मण पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पवार यांचे बंधु विकी पवार यांनी अग्नी दिला. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून बंदुकीचा 24 फेऱ्या हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी आजी माजी आमदार विविध संस्थाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जवान लक्ष्मण पवारांना वीरगती प्राप्त
जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव घेऊन आलेले सुभेदार नरसिंग राजशेखर ग्यानी यांनी मृत्यूबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “लक्ष्मण पवार हे आमच्या टीममध्ये काम करत होते. मी त्यांचा वरीष्ठ अधिकारी होतो,ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होते. तिन्ही दलातील सैनिकांनवर उपचार करण्याचे काम आम्ही करत असतो. जिथे-जिथे सैन्यदल असते त्याठिकाणी उपचार सेवा देण्यासाठी जावे लागते. बर्फाळ प्रदेश व बर्फवृष्टी होणाऱ्या ठिकाणी सतत काम केल्याने आँक्सिजन कमतरतेमुळे आम्हा जवानांना हेडँक(डोकेदुखी) सारखे आजार होतात, त्याचे निदान होईपर्यत आजार उपचारा बाहेर गेलेला असतो. जवान लक्ष्मण पवार यांना जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जास्त दिवस काम केल्याने असा आजार उद्भवला. मृत्युच्या दोन दिवस अगोदर हेडँक(डोकेदुखी) चा त्रास बळावला त्यावर उपचार सुरु असताना त्यांना वीरगतीचे मरण आले”