Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेत 400 पारचा नारा पूर्ण होणार का? देशासह महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता

लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीने चुरशीची लढत दिल्यामुळे भाजपचा 400 पारचा नारा पूर्ण न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 04, 2024 | 11:55 AM
लोकसभेत 400 पारचा नारा पूर्ण होणार का? देशासह महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : आज लोकसभा निवडणूक निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. संपूर्ण देशासहस संपूर्ण जगभरातून भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. भाजप हॅटट्रीक करणार का आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने सुरुवातीपासून 400 पारचा नारा दिला आहे. देशातील एकूण 543 लोकसभा निवडणुकीच्या जागांवर मतदान पार पडत आहे. सर्वांत जास्त लोकसभेच्या जागा उत्तर प्रदेश व महाराष्ट्रामध्ये आहेत. दोन्ही राज्यांमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे भाजप यंदा 400 पारचा दिलेला नारा पूर्ण करु शकेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजप 400 पार होणार का ?

नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून लोकसभेला उभे आहेत. तर अमित शाह हे गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आघाडी कायम राखली आहे. तसेच अमित शाह यांनी गांधीनगरमध्ये तब्बल 75 हाजर मतांची आघाडी घेतली आहे. भाजप नेते आघाडीवर असले तरी अनेक ठिकाणी भाजपला धक्का बसला आहे. एकूण 543 जागांसाठी निवडणूक झाली असून तब्बल 290 मतदारसंघामध्ये भाजपने आघाडी मिळवली असल्याचे कलांमधून दिसत आहे. तर इंडिया आघाडीने एनडीए आघाडीला ‘काटे की टक्कर’ दिली आहे. इंडिया आघाडीला देशामध्ये 230 जागांचा कल दाखवला जात आहे. त्यामुळे एनडीए आघाडीवर इंडिया आघाडी यांच्यामध्ये जास्त जागांचा फरक सध्या तरी दिसून येत नाही. इतर पक्षांना 19 जागा मिळत असल्याचा कल समोर येत आहे. देशभरामध्ये मतमोजणी अद्याप सुरु असली तरी कलांप्रमाणे इंडिया आघाडी देखील चुरशीची लढत देत आहे. त्यामुळे भाजपने दिलेला 400 पारचा नारा सध्या तरी शक्य होणार नसल्याचे चित्र समोर आहे.

राज्यामध्ये देखील भाजपला धक्का

राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगदार लढत झाली. राज्याचे राजकीय गणित बदलल्यानंतर पहिलीच लोकसभा निवडणूक पार पडत आहे. राज्यामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडत असून यामध्ये महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला तब्बल 25 जागांचा कल मिळत आहे. अनेक भाजपचे स्टार उमेदवार पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. यामध्ये अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा तसेच बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे या पिछाडीवर असल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. मराठवाड्यामध्ये भाजपची एकाही जागेवर आघाडी नाही. तसेच राज्यातील तीन केंद्रीय मंत्री देखील पिछाडीवर आहे. नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे आणि भारती पवार हे भाजप उमेदवार पिछाडीवर आहे. तसेच कपिल पाटील देखील पिछाडीवर आहे. देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले दुसरे मोठे राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का बसत आहे. त्यामुळे भाजप 400 पार करेल का नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Lok sabha elections result 2024 bjp likely to get a big shock in maharashtra with the country may not possible to get 400 seat nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • Lok Sabha Elections result 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.