259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले
मुंबई : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील २५९ धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटविण्यात आले. ज्यामध्ये १८० मंदिरे, ४५ मस्जीद, १ गुरुद्वारा आणि ३३ बौद्धविहारांचा समावेश आहे. याशिवाय, लाऊडस्पीकरची तीव्रता कमी करण्यात आली आणि आवाजाची तीव्रता प्रतिष्ठानाबाहेर जाऊ नये, अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली.
गोंदिया पोलिस दलाने धार्मिक आणि इतर आस्थापनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी पोलिस स्टेशनस्तरावर एक बैठक आयोजित केली. जेणेकरून ते धार्मिक स्थळे आणि इतर आस्थापनांमधून अनधिकृत लाऊडस्पीकर इत्यादी स्वतः काढून टाकू शकतील. त्यानुसार, जिल्ह्यातील बहुतेक धार्मिक स्थळे आणि इतर आस्थापनांमधून भोंगे, लाऊडस्पीकर इत्यादी उत्स्फूर्तपणे आणि संबंधित आस्थापनांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून काढण्यात आले.
आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील एकूण 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटविण्यात आले. ज्यामध्ये १८० मंदिरे, ४५ मशीद, १ गुरुद्वारा आणि ३३ बौद्धविहारांचा समावेश आहे. धार्मिक आणि इतर आस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी स्वतः धार्मिक स्थळे आणि इतर आस्थापनांमधून लाऊडस्पीकर आदी काढून टाकण्यासाठी कारवाई करून पोलिस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
कायद्याची अंमलबजावणी सुरू
नुकतीच उच्च न्यायलयाने क्रिमिनल रिट पिटिशन क्र. ४७२९/२०२१ संदर्भात बेकायदेशीररित्या बसविलेल्या लाऊडस्पीकर आदींमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत कायद्याच्या अंमलबजीवणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात धार्मिकस्थळ व इतर आस्थापनांवर अनाधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर आदी आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.