Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला…

चैत्र नवरात्रीत वारंगलच्या प्राचीन भद्रकाली मंदिराची कथा पुन्हा चर्चेत येते. मान्यतेनुसार काकतीय राजाने कोहिनूर हिरा देवीच्या डोळ्यात बसवला होता, जो नंतर आक्रमणात लुटला गेला. मंदिर आजही श्रद्धेचे केंद्र आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 08:24 AM
भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला...

भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला...

Follow Us
Follow Us:
  • तेलंगणातील वारंगल येथे भद्रकाली देवीचे एक अद्भुत मंदिर आहे.
  • हे मंदिर फार जुने असून मंदिरातील भद्रकाली मातेच्या डोळ्यात त्याकाळी कोहिनुर हिरा असल्याचे सांगितले जाते.
  • चला जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याचा मंदिराशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया.
19 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असून हा उत्सव 27 मार्चपर्यंत साजरा केला जाणार आहे. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. देशभरात देवीची अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत. मात्र तेलंगणातील वारंगल येथे असलेल्या भद्रकाली मातेशी एक अतिशय रोचक आणि रहस्यमय इतिहास जोडलेला आहे. असे सांगितले जाते की जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याचा संबंध कधीकाळी या मंदिराशी होता.

IRCTC चे जबरदस्त Kashmir Tour Package, किंमत फक्त 27 हजाराने सुरू…

भद्रकाली तलावाच्या काठावर वसलेले प्राचीन मंदिर

तेलंगणातील वारंगल शहरात असलेले भद्रकाली मंदिर हे भारतातील अतिशय प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. वारंगल आणि हनमकोंडा या शहरांच्या दरम्यान एका टेकडीवर, भद्रकाली तलावाच्या काठावर हे मंदिर वसलेले आहे. इतिहासानुसार इ.स. 625 च्या सुमारास चालुक्य राजवटीत या मंदिराची उभारणी करण्यात आली होती.

काकतीय राजाने देवीला अर्पण केला कोहिनूर

काही इतिहासकारांच्या मते या मंदिराचा संबंध काकतीय राजवंशाशीही जोडला जातो. त्या काळातील काकतीय राजाने देवी भद्रकालीला कोहिनूर हिरा अर्पण केल्याची कथा प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की काकतीय राजा प्रतापरुद्र द्वितीय यांनी खाणीत सापडलेला कोहिनूर हिरा सुरक्षित ठेवण्यासाठी देवी भद्रकालीच्या डाव्या डोळ्यात बसवून ठेवला होता.

आक्रमणात हिरा लुटला गेला

काळाच्या ओघात मंदिरावर आक्रमण झाले. आक्रमणकर्त्यांनी मंदिराची हानी केली आणि देवीच्या मूर्तीतील कोहिनूर हिरा काढून नेला. त्यानंतर अनेक वर्षे हे मंदिर ओसाड अवस्थेत राहिले. इतिहासानुसार हा हिरा पुढे दिल्ली सल्तनतीच्या शासकांकडे गेला आणि नंतर तो इंग्रजांच्या ताब्यात पोहोचला.

1950 पूर्वी मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. 1950 च्या सुमारास मंदिरात धातू आणि रत्नांनी सजवलेली देवीची नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी येण्यास सुरुवात केली. आज हे मंदिर आपल्या अनोख्या वास्तुकलेमुळे, समृद्ध इतिहासामुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे.

गर्भगृहातील देवीची भव्य मूर्ती

मंदिराच्या गर्भगृहात धातू आणि रत्नांनी सजलेली देवी भद्रकालीची भव्य मूर्ती आहे. या मूर्तीला आठ भुजा असून प्रत्येक हातात विविध अस्त्र-शस्त्रे आहेत. देवीचे हे रूप शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. मंदिराची रचना नागर शैलीत करण्यात आली असून यात चौकोनी गर्भगृह, पिरॅमिडसारखा शिखरभाग आणि स्तंभांनी सजलेला मंडप आहे.

भारतातील Scotland ला कधी भेट दिली आहे का? IRCTC घेऊन आला खास टूर पॅकेज, किंमत 10,000 हून कमी…

कोहिनूरशी जोडलेली स्थानिक मान्यता

स्थानिक लोकांमध्ये अशीही श्रद्धा आहे की कोहिनूर हिऱ्यावर लोभ करणाऱ्यांचे कधीही भले झाले नाही. मग ते मुघल शासक असोत, फारसी आक्रमक असोत किंवा इंग्रज असोत—ज्यांच्या हातात हा हिरा गेला, त्यांना संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांच्या मते कोहिनूर हा खरा सुरक्षित फक्त देवी भद्रकालीच्या संरक्षणाखालीच होता.

Web Title: Telangana bhadrakali mata temple where the kohinoor diamond was placed in the eye of the goddess travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Religious Places
  • Telangana
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
1

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
2

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
3

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
4

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.