Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाहीर; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते निवड

गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 25 लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे.  

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 14, 2025 | 11:30 PM
Nitesh Rane: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाहीर; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते निवड

Nitesh Rane: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाहीर; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते निवड

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन बालकांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्य उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या लकी ड्रॉमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील 17 विविध योजनांच्या एकूण 234 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 25 लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे.  सर्वसाधारण गटातील प्रमोशन ऑफ रिक्रेशनल फिशरीज या 50 लक्ष रुपयांच्या योजनेचा लाभ एका लाभार्थ्याला देण्यात आला. मत्स्य तलाव जैविक प्रकल्प या 50 लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा लाभ अनुसुचित जमातीच्या 6 लाभार्थ्यांना आणि 32 महिला लाभार्थ्यींची निवड करण्यात आली. तसेच मत्स्य तलाव योजनेसाठी 6 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेमध्ये प्रत्येकी 25 लक्ष या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मध्यम मत्स्य जैविक प्रकल्पासाठी 27 लाभार्थी निवड करण्यात आली. प्रत्येकी 25 लक्ष रुपये याप्रमाणे एकूण 6 कोटी 75 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनासाठी 22 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत प्रत्येकी 54 लक्ष या प्रमाणे एकूण 11 कोटी 88 लक्ष  रुपयांचा लाभ दिला जातो. 10 टन क्षमतेचे शीतगृह आणि बर्फ कारखाना उभारणे या योजनेसाठी 5 महिला लाभार्थींची निवड करण्यात आली. या योजनेत प्रती लाभार्थी 40 लक्ष या प्रमाणे एकूण 2 कोटींचा लाभ दिला जातो.

20 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना यासाठी 4 महिला लाभार्थी, प्रती लाभार्थी 80 लक्ष  या प्रमाणे 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तर दीड कोटी रुपयांच्या 50 टन क्षमतेचे शीतगृह आणि बर्फ कारखाना यासाठी एका महिला लाभार्थीची निवड करण्यात आली. 6 लाभार्थींना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांच्या रेफ्रिजेरेटेड व्हेईकलचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत एकूण दीड कोटींच्या लाभाचे वाटप होणार आहे. इन्सुलेटेड व्हेईकल गटात 16 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे एकूण 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

 याशिवाय 75 हजार रुपयांच्या मोटार सायकलसह आईस बॉक्स गटासाठी 9 लाभार्थी, 3 लक्ष रुपयांच्या थ्री व्हीलर सह आईस बॉक्स इन्क्लुडिंग ई-रिक्शा फॉर फिश वेंन्डीग या गटासाठी 7 लाभार्थींची निवड करण्यात आली. 20 लक्ष रुपयांच्या लाईव फिश वेन्डींग सेंटरसाठी 37 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या गटात प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे 7 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ  दिला जाणार आहे.

 30 लक्ष रुपयांच्या मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 2 टन अ डे या गटासाठी 12 लाभार्थी, 1 कोटी रुपयांच्या मिडियम मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 8 टन अ डे या गटासाठी 1, प्रत्येकी 10 लक्ष रुपयांच्या कन्स्ट्रक्शन ऑफ फिश किओस्क इन्क्लुडिंग किओस्क ऑफ ॲक्वेरिअम, ओर्नामेंटल फिश या गटासाठी 9 महिला लाभार्थी आणि पारंपारीक मच्छिमारांसाठी खोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौकांना सहाय्य या योजनेसाठी 18 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रत्येकी 1 कोटी 20 लाख या प्रमाणे एकूण 21 कोटी 60 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.  या योजनांसाठी राज्यभरातून एकूण तीन हजार अर्ज आले होते. यापैकी 234 लाभार्थ्यांची निवड आज लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आली.

Web Title: Lucky draw for selection of beneficiaries of pradhan mantri matsya sampada yojana announced by minister nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • lottery news
  • Mumbai
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.