Mahadev Gitte vs Valmik Karad Beed Jail Gangwar happens only over one sentence
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपपत्रात वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून आरोप करण्यात आला आहे. सध्या बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये तुरुंगात वाद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
बीडच्या कारागृहामध्ये गित्ते विरुद्ध कराड असा वाद उफाळला असल्याचे समोर आले आहे. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर महादेव गित्ते याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. मात्र त्याला दुसऱ्या तुरुंगामध्ये नेताना गित्ते यांनी कराडने मारहाण केल्याचा आरोप केला. यामुळे बीड तुरुंगातील हे आरोपींचे गॅंगवार समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, बीडमधील गित्ते विरुद्ध कराड अशी लढत एका वाक्यामुळे झाली असल्याचे बोलले जात आहे. महादेव गित्तेच्या टोळीकडून वाल्मिक कराडच्या टोळीला बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन टोमणे मारण्यात आले. आता जिरली का? की अजून जिरायची आहे, असे टोमणे मारण्यात आले. यानंतर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांच्यामध्ये राडा झाला. आता पुढील वाद टाळण्यासाठी गित्तेला छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार सुरेश धस यांनी या जेलमधील मारहाणीमध्ये फक्त कानाखाली मारली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी त्यांना व्हीलन ठरवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. ते म्हणाले की, “खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले आहेत. राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं मुंबईत आणली गेली. धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं, बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवायचं होतं असा गंभीर आरोप धस यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ माजली आहे.
बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बीड तुरुंग प्रशासनाने हे वृत्त फेटाळले आहे. प्रशासनाच्या मते, तुरुंगातील टेलिफोन वापरण्यावरून दोन कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता, परंतु या वादात ना वाल्मिक कराडचा सहभाग होता, ना सुदर्शन घुलेचा. घटनेच्या वेळी हे दोघे घटनास्थळी नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तुरुंगात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासन जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.