Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामभक्तांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन, मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

रामभक्तांना मनोभावे दर्शन घेता यावं या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र  भवनाची उभारणी करण्यात येणार आहे.यासाठीचे भूमिपुजन करण्यात आले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 08, 2024 | 01:28 PM
रामभक्तांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन, मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

रामभक्तांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन, मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Follow Us
Close
Follow Us:

श्रीराम जन्मभूमीचं महत्त्व देशातील राम भक्तांसाठी खूप मोठं आहे. प्रभू रामाच्या अयोध्या नगरीत त्यांच्या भव्य मंदिराची स्थापना झाली हा दिवस देशाभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. अशातच आता अयोध्येत राम भक्तांच्या निवासासाठी महाराष्ट्र भवनाची उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या होणाऱ्या वास्तूसाठीचे भूमिपूजन मंगळवारी संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले.त्यावेळी राज्य शासनाच्या सचिव मनीषा म्हैसकर, यूपीचे आमदार आदींची विशेष उपस्थिती होती.

हेही वाचा- पुण्यातील सर्वच्या सर्व जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढविणार ; शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती

अयोध्येत महाराष्ट्रामधून येणाऱ्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. प्रभू रामांचे मनोभावे दर्शन भाविकांना करता यावं, तसंच आयोध्येतील प्रभू रामांच महत्त्व काय होतं याची माहिती भाविकांना मिळावी या हेतूने महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचं सांगितलं आहे. राम मंदिर हे देशातील तमाम हिंदूसाठी अभिमानाची बाब आहे. या भव्य मंदिराची उभारणी झाल्यानंतर दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक मंडळी तसंच राम भक्तांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. म्हणूनच लांबून येणाऱ्या भक्तांची योग्य रीतीने सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे महाराष्ट्र भवन उभारण्यात येत आहे.

हेही वाचा- भाजपचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाची ‘या’ जागेसाठी मागणी, न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा

हिंदुत्वाचा मानबिंदू असलेले हे अयोध्येतील पवित्र राम जन्मभूमी मंदिर जगभरातील हिंदूंना नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देत असते. यावेळी बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली.भूमिपूजन झाल्याने आता भवनाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल आहे अशी प्रतिक्रिया अयोध्या परिसरातील मराठी बांधवांनी व्यक्त केली.


        														

                           
				

Web Title: Maharashtra bhavan to be built in ayodhya for ram devotees bhoomipujan of the building by dignitaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • ram mandir
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना
1

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे
2

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा
3

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

‘I love Muhammad’ वरून बरेलीमध्ये निदर्शने, मौलाना तौकीर रझा यांच्या समर्थकांनी दगडफेक केली; पोलिसांचा लाठीचार्ज
4

‘I love Muhammad’ वरून बरेलीमध्ये निदर्शने, मौलाना तौकीर रझा यांच्या समर्थकांनी दगडफेक केली; पोलिसांचा लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.