Photo Credit- Social Media (चिचवड विधानसभा निवडणूक )
चिंचवड : राज्यातील सर्व राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आली आहे.
अशातच गेल्या काही दिवसांपासून चिंचवडच्या जागेवरून भाजपमध्येच कुरबूर सुरू असल्याची चर्चा होती. त्यातच आता पुन्हा एकदा चिंचवडच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, चिंचवडची ही जागा, भाजपच्या वाट्याची असताना या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाने दावा ठोकला आहे. त्यामुळे चिंचवडच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार यांच्या गटात वाद वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे. ती जागा त्याच पक्षाला दिली जाणार आहे. चिंचवडच्या जागेवर सध्या भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप या जागेवरून निवडून आल्या. दरम्यान, चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवारांनी ही जागा राष्ट्रवादीला घेण्याचे आश्वासनही दिले होते. पण अजित पवारांच्या मागणीमुळे स्थानिक समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, महायुतीमध्ये सध्या पिंपरी-चिंचवड विधानसभेची जागा भाजपकडे आहे. आता महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार या जागेवर भाडपचा दावा असून अश्विनी जगताप यांना किंवा त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण अजित पवारांच्या गटाच्या स्थानिक नेत्यांनी चिंचवडसाठी आग्रह धरल्याने या जागेवरून वाद होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
पण महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपच्याच वाट्याला जाणार आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही जाना न मिळाल्यास त्याठिकाणी बंडखोरी करून निवडणूक लढण्याचा इशाराही काही स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
हेही वाचा: LiveJ&K Election Results 2024 LIVE : जम्मू-काश्मीरमध्ये पहिला विजयी उमेदवार जाहीर