Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान-शाहरुख, नीता अंबानी ते टाटा-बिर्ला…, देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीच्या VIP पाहुण्यांची यादी

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 05, 2024 | 04:44 PM
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीच्या VIP पाहुण्यांची यादी (फोटो सौजन्य-X)

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीच्या VIP पाहुण्यांची यादी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

महायुती सरकारचा आज (5 डिसेंबर) शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील प्रतिष्ठित आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. तसेच राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नीता अंबानी यांच्यासोबतच बॉलीवडू अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानही शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला ४२ हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थित असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह किमान 10 केंद्रीय मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज (5 डिसेंबर) सायंकाळी 5.30 वाजता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Maharashtra CM Oath Ceremony Live : राज्याला मिळणार नवं सरकार, शपविधी सोहळ्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध व्यक्ती

शपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि राधिका अंबानी यांच्याशिवाय अनंत अंबानी, प्रणय अदानी हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त नोएल टाटा, दीपक पारिख, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर हे देखील या शपथविधी सोहळ्यात उपस्थिती दाखवणार आहेत.

या शपथविधी सोहळ्याला चित्रपट जगताशी निगडित अनेक प्रसिद्ध चेहरेही उपस्थित राहणार आहेत. जसे की, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, बोनी कपूर आणि एकता कपूर यांच्यासह श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शाह यांचाही समावेश असेल.

५० हजारांहून अधिक VIP

भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बिरेंद्र सराफ आणि अनिल काकोडकर हे देखील या सोहळ्याचा भाग असणार आहेत.

आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला ४२ हजार लोक उपस्थित आहेत. पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय सुमारे 10 केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन आणि जेपी नड्डा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी होणार आहेत. याशिवाय 19 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या सोहळ्याचा भाग असणार आहेत.

कार्यक्रमात 2 हजार व्हीआयपींसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 40 हजारांहून अधिक लोकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी चार हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 3,500 पोलिस आणि 520 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही! महाराष्ट्रात अजूनही ट्विस्ट बाकी आहे का?

Web Title: Maharashtra cm oath taking ceremony list of vip guests of devendra fadnavis swearing in ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 04:44 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • narendra modi
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
3

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
4

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.