congress celebration after karnataka results
मुंबई: कर्नाटकमध्ये (Karnataka Election) काँग्रेस (Congress) पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातील (Congress Celebration) कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दादरमधील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये काँग्रेस नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. बजरंगबलीची गदा या भ्रष्टाचारांच्या डोक्यावर जोरात पडलेली आहे आणि काँग्रेसचा फार मोठा विजय झालेला आहे. येत्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या विजयाची नांदी आहे. काँग्रेसचं या देशाला न्याय देऊ शकतो. मोठ्या उत्साहाने फटाके फोडून व नारेबाजी करत सर्व पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवत साजरा केला. (Karnataka Election Results 2023)
[read_also content=”धनशक्तीचा पराभव आणि जनशक्तीचा विजय, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-reaction-about-karnataka-election-results-2023-nrsr-398759.html”]
डोंबिवली
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय खेचून आणत एकहाती सता आणली. या विजयाचा आनंदोत्सव डोंबिवली शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला. पूर्वेकडील इंदिरा चौकात फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरविले. राहुल गांधी आगे बढो हम आपके साथ है, काँग्रेस झिंदाबाद अशा घोषणा देत इंदिरा चौकातील रिक्षा चालकांसह नागरिकांना पेढे वाटप केले. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकल जाहीर होताच एक-एक करीत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. शहरात असे दृश्य म्हणजे डोंबिवलीकरांना अचंबीत करणारे होते. पूर्वेकडील इंदिरा चौकात एकत्रित झालेल्या कार्यकर्त्यांनी आनंदाने घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान फटाक्यांची आतषबाजी होतच गेली. यावेळी यावेळी प्रदेश प्रतिनिधि एमपीसीसी पॉली जैकब, मानव अधिकार जिल्हा अध्यक्ष राजकुमार हीरावत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद पिल्लई, सचिव प्रमोद त्यागी, डोंबिवली शहर अध्यक्ष अजय पौळकर, आरोग्य सेल जिल्हाअध्यक्ष जितेंद्र मुळे, संतोष चंद्रपीनी, राजू सोनी, सत्यवान मूलम, श्रेयाश सिंह, निर्मल कुमार, शमशेर खान, दत्ता खरात, संकेत चौधरी, कृष्णा ठाकूर, यादव आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
ठाण्यात काँग्रेसचा जल्लोष
कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळत असलेल्या ऐतिहासिक प्रतिसादामुळे ठाणे काँग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी 2 वाजता ठाणे काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात,फटाके फोडून याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. ठाणे काँग्रेस अध्यक्ष वकील विक्रांत चव्हाण,शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे,महिला अध्यक्षा वैशाली भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं की, भाजपा सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करून कर्नाटकातील काँग्रेस व विरोधी पक्षनेत्यांवर सुडबुद्धीने विविध कारवाया केल्या. त्यामुळे कर्नाटक जनतेने त्यांना त्याची खरी जागा दाखवून दिली. पंतप्रधान फक्त मन की बात करीत राहीले,जन की बात मात्र करीत नव्हते परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कायम जनतेमध्ये जाऊन जन की बात ऐकत होते त्याचे प्रश्न समजावून घेत होते,भाजपा करित असलेले जातीयवादी विचार कर्नाटक जनतेने उधळून लावले व सर्व धर्म समभावचा नारा देणाऱ्या काँग्रेसला साथ दिली.
धाराशिव
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने घोडदौड सुरु केली आहे. मोदी-शहा जोडीने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत भाजपाला हार पत्कारावी लागली आहे. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला.
[read_also content=”आय एम अनस्टॉपेबल, निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने शेअर केला राहुल गांधींचा खास व्हिडिओ https://www.navarashtra.com/india/congress-shared-video-of-rahul-gandhi-after-karnataka-election-results-2023-nrsr-398745.html”]
बीड
कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष बीडमध्ये जिल्हा काँग्रेसच्या वतीने साजरा करण्यात आला. बीड शहरातील बशिरगंज चौकात, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवले. दक्षिण भारताची विजयाची वाटचाल महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस आगामी निवडणुकीत करिष्मा दाखवील, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहिला मिळाला. ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
सोलापूर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीकडून जल्लोष करण्यात आला. सोलापुरातील विजय चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी असलेल्या दावणगिरी लोकसभा मतदारसंघातील आठ पैकी सहा जागेवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सोलापुरातील विजय चौकातील काँग्रेस आघाडी कडून ढोल ताशा वाजवत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. काँग्रेस पदाधिकार्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अमरावती
कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता उलथून टाकत काँग्रेसने एका हाती सत्ता मिळवली. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच ढोल ताशांच्या गजरात काँग्रेस नेत्यांनी चांगलाच ठेका धरला. चौकामध्ये चांगलाच जल्लोष करण्यात आला. यावेळेस काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक
कर्नाटकमध्ये काँग्रेसने विजयाची मुसंडी मारल्यानंतर नाशिकच्या काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळेस काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या नावाने तसेच राहुल गांधी यांच्या नावाने जयघोष करत काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ठेका धरला. महागाईचे प्रतीक असलेल्या सिलेंडरला पुष्पहार घालण्यात आला आणि ही महागाई देशभरात वाढलेली आहे.त्यामुळेच भाजपाचा पराभव झाला आहे. धर्माच्या नावावर मत मिळवण्याचा भाजपने प्रयत्न केला मात्र तेथील मतदारांनी त्यांना साफ पणे नाकारला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली आहे.
कल्याण
कर्नाटकात काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड जल्लोषात विजयाचे स्वागत करण्यात येत आहे. कल्याण शहरात देखील शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सर्वसामान्य जनतेने भाजपला दिक्षिणेत नाकारले असून काँग्रेस पक्षाचे राहूल गांधी हे आगमी लोकसभा निवडणूकी नंतर पंतप्रधान होतील ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष असेल असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे यांनी करीत अगामी काळात इतर राज्यात होणाऱ्या निवडणूकीत भाजपचे हार होणार असून भाजप मुक्त देश होईल. असा ही टोला याप्रसंगी लावला. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेल्या जल्लोषात ढोल ताशा ,फटाके व पेढे भरवित साजरा केला. काँग्रेसचे माजी आमदार संजयदत्त, काँग्रेस पदाधिकारी, सचिन पोटे, सुरेन्रद आढाव, शकील खान, दशरथ पाटील, शैलेश खंडेवाल, मुन्ना तिवारी महिला पदाधिकारी कांचन कुलकर्णी, आदि सह कार्यक्रर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.