Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Court Employees : न्यायालयीन कामकाज ठप्प होण्याची शक्यता! राज्यभरातील कर्मचारी बेमुदत संपावर

Satara Court Employees : महाराष्ट्रातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप सुरू . उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी अशी मागणी

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 17, 2026 | 07:59 PM
34,000 Employees Begin Indefinite Strike Over Salary Revision ( वेतन सुधारणेच्या मागणीवरून ३४,००० कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू )

34,000 Employees Begin Indefinite Strike Over Salary Revision ( वेतन सुधारणेच्या मागणीवरून ३४,००० कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू )

Follow Us
Follow Us:
  • न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी मिळावी   
  • सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा शासनाने तातडीने निर्णय घ्यावा   
  • न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता  
Satara Court Employees :  वाई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवार (दि. १७ नोव्हेंबर) पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही गेल्या २२ महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने अखेर राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपात सातारा जिल्ह्यासह वाईतील न्यायालयीन कर्मचारीही सहभागी झाले आहेत.

न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी मिळावी

न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा म्हणून ओळखले जाणारे न्यायालयीन कर्मचारी न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. न्यायालयीन कामकाजाचा वाढता व्याप, वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण सांभाळत असतानाही त्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मात्र प्रलंबित राहिला आहे. शासनदरबारी वारंवार मागण्या, निवेदने आणि पाठपुरावा करूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. नामदार उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी मिळावी, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. ही कोणतीही विशेष सवलत नसून समान कामासाठी समान वेतन मिळणे हा आपला न्याय्य हक्क असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

विशेष म्हणजे, राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी एकत्र येत एकमुखी ठराव करून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि २२ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आता आणखी विलंब करू नये, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Mumbai Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणकरांचा प्रवास होणार सुसाट! कशेळी डेपोमध्ये पहिली मेट्रो दाखल; प्रवासी सेवेकडे महत्त्वाचे पाऊल

न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

वाई न्यायालयातील ८५ कार्यरत कर्मचारी आणि १५ सेवानिवृत्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही या संपाची तीव्रता दिसून येत आहे. राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुधारित वेतनश्रेणीचा निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शासन या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढणार की कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आणखी तीव्र होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Satara News : पाणीबचतीचे आदेश कागदावरच; धोम उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

 

Web Title: Maharashtra court employees indefinite strike salary revision wai satara news sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Court

संबंधित बातम्या

Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका
1

Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.