Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

Satara Court Employees Strike : सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. वकील बार असोसिएशननेही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 17, 2026 | 06:57 PM
Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

Follow Us
Follow Us:
  • सुधारित वेतनश्रेणीची मागणी
  • कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • वकील संघटनेचाही आंदोलनाला पाठिंबा
Satara Court Employees Strike : प्रलंबित वेतनश्रेणीचा प्रश्न आणि शासनाच्या निर्णयातील विलंब यामुळे सातारा जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा असंतोष अखेर रस्त्यावर आला आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दुय्यम न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी सोमवारपासून जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने न्यायालयीन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

समान वेतनश्रेणीची कर्मचाऱ्यांची मागणी

महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे आंदोलन छेडण्यात आले आहे. समान कामासाठी समान वेतन या तत्त्वानुसार दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2025 रोजी सुधारित वेतन श्रेणी संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी यापूर्वी काळ्या फिती लावून काम करणे, निवेदने देणे आणि सामूहिक रजा आंदोलन अशा टप्प्यांतून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. तरीही प्रश्न मार्गी न लागल्याने आता बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप

वकील बार असोसिएशनचाही पाठिंबा

या आंदोलनात जिल्हा न्यायालयीन कर्मचारी, लघुलेखक, बेलिफ तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. दरम्यान, सातारा जिल्हा वकील बार असोसिएशननेही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना रास्त ठरवत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
केवळ वेतनश्रेणीच नव्हे, तर न्यायालयीन कर्मचाऱ्यांसमोरील कामाचा वाढता व्याप, अपुरे मनुष्यबळ, रिक्त पदांचा प्रश्न आणि संगणकीय व पारंपरिक अशा दोन्ही पद्धतींनी काम करण्याची जबाबदारी यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार

शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वर्ग तीन लिपिक संघटनेचे सतीश जाधव, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष संजय गुरव, जिल्हा बेलिफ संघटनेचे अध्यक्ष अमित भोसले, वर्ग चार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अमर कुडाळकर यांच्यासह जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: साताऱ्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे?

    Ans: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

  • Que: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन कधी सुरू झाले?

    Ans: सोमवारपासून सातारा जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

  • Que: कोणत्या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे?

    Ans: महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे आंदोलन सुरू आहे.

Web Title: Satara court employees strike indefinite salary revision demand rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Court
  • Salary Hike
  • Satara

संबंधित बातम्या

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान
1

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा
2

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख
3

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत मतभेद? जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
4

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत मतभेद? जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.