Maharashtra Cricket Team Announced for Ranji Trophy 2025 will Play Matches Under The Leadership of Ruturaj Gaikwad
Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफीकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात संघ खेळणार आहे. महाराष्ट्राच्या संघाने यापूर्वी मुश्ताक अली ट्रॉफीमध्येसुद्धा चांगली कामगिरी केली होती. भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू रणजी खेळताना दिसणार आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मापासून विराट कोहली, ऋषभ पंत असे अनेक दिग्गज रणजीमध्ये परफॉर्म करताना दिसणार आहेत.
हेड कोच गौतम गंभीरने दिली सक्त ताकीद
भारतीय संघाची कसोटीमधील अत्यंत खराब कामगिरीनंतर मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले. यानंतर हेड कोच गौतम गंभीरने भारतीय संघातील खेळाडूंना सक्त ताकीद देत देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल असे बजावून सांगितले. त्यानंतर लगेचच भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी घरच्या टीममधून रणजीमध्ये खेळण्यासाठी टीममध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्राचा संघ जाहीर
👏 Proud of Team Maharashtra!
Reaching the Semi-Finals of the Vijay Hazare Trophy is a testament to the hard work, dedication, and team spirit of our players. 💪
We may have fallen short today, but we’ve proven that Maharashtra is among the top 4 white-ball cricket teams in the… pic.twitter.com/v1YincQTD9
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) January 16, 2025
महाराष्ट्राचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सिद्धेश वीर, पवन शाह, यश क्षीरसागर, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवले, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज, प्रशांत सोलंकी, रजनीश गुरबानी, प्रदीप दधे, मुकेश चौधरी, मुर्तझा ट्रंकवाला, सत्यजित बच्छाव, धनराज शिंदे (विकेटकिपर) सनी पंडित
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सुमार कामगिरी
भारताचा संघ नुकताच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळून आला आहे. यामध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने ३-१ असे पराभूत करून मालिका जिंकली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माच्या कर्णधारपदावर त्याचबरोबर भारतीय संघाच्या फलंदाजीवर मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता आगामी मालिकेमध्ये भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध T२० मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा
टीम इंडिया लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा करणार आहे. या संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड निश्चित आहे. खराब फॉर्म आणि कर्णधारपदामुळे रोहित गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या रडारवर आहे. त्याने आता आपला जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मंगळवारी सकाळी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सराव सत्रात तो सामील होणार आहे. याबाबत त्यांनी मुंबई संघ व्यवस्थापनाला माहिती दिली आहे. एवढेच नाही तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी त्याने एमसीए-बीकेसी मैदानावर पुन्हा सराव सुरू केला आहे.