मुंबई – मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. त्यामुळं महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. सीमावादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा (Karnatak government) निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना उद्रेक होत आहे.
[read_also content=”समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा – मुख्यमंत्री https://www.navarashtra.com/maharashtra/inauguration-of-samruddhi-highway-by-prime-mnister-on-sunday-352213.html”]
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde-fadnavis government) सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टिका होत आहे. तसेच याप्रश्नी केंद्राने हस्तक्षेप करुन या प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, या सर्व पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Ekikaran Committee) बेळगावात 19 डिसेंबरला महामेळावा घेणार आहे. या महामेळावात सीमाप्रश्न, मराठी भषिकांवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार आदीवर ऊहापोह होणार आहे.
दरम्यान, या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं आहे, पण शरद पवार येणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान, हा महामेळावा होत असताना, दुसरीकडे बेळगावात सर्वपक्षियांची बैठक देखील होणार असल्याचं बोललं जात आहे, त्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांना आमंत्रित केलं आहे.