विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी २ दिवस उरले आहेत. तरी महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी २ दिवस उरले आहेत. तरी महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी खलबते सुरू आहेत. दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र बसून जागावाटपाच तिढा सोडावावा, असा आदेश हायकमांडनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र सत्र सुरू झालं आहे.
महायुतीकडून २१५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ५३ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र मिक्ष पक्षांना अद्याप एकही जागा जाहीर करण्यात आलेली नाही. एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या आरपीआयने या आधी ८-१० जागा मागितल्या होत्या. मात्र कोणताच निर्णय झाला नाही, त्यामळे २-३ जागा तरी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा-Maharashtra Election 2024 : विदर्भात भाजपला खिंडार; मोठा नेता लागला शरद पवारांच्या गळाला
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जवळपास ५० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र अजून १० जागांसाठी आग्रही आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान जागावाटपाच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. जागा वाटपाबाबत असलेला तिढा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस फडणवीस यांनी बसून सोडवावा असे दिल्लीतून आदेश आलेत. आज रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांची शेवटची यादी जाहीर होण्याची शक्यता.
हे देखील वाचा-Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये दोन चंद्रकांत आमनेसामने, ठाकरे गटाने ए.बी फॉर्मही दिला
मराठा आरक्षणाचा मुद्दा, फोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेल्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला यावेळची निवडणूक तशी सोपी नसेल, असा दावा करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. विजय महायुतीचाच होणार आहे. आकडा लावणाऱ्यांपैकी आम्ही नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि महायुतीतील मित्रपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करेल, असा विश्वास फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केला आहे.
महायुतीकडून महाराष्ट्रात आरपीआय आठवले गटाला अद्याप एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कुठल्याच उमेदवाराचं प्रचार करणार नसल्याचं आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. मुलुंडमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा निषेध केला. ईशान्य मुंबईत आरपीआयचे कार्यकर्ते महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं यावेळी या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं, त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.