कोथरूडमध्ये यावेळी भाजपचे उमदेवार चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे असा सामना रंगणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात भाजपने जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. कोथरूड मतदारसंघात
पुन्हा चंद्रकांत पाटील रिंवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचाही या मतदारसंघात उमेदवार ठरला आहे. ठाकरे गटाने चंद्रकांत मोकाटे यांना ए.बी फॉर्म दिला आहे. .त्यामुळे आता कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना होणार आहे.
कोथरूडमधील उमेदवार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर मोकाटे यांना संधी देण्यात आली आहे. तर कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर रिंगणात असणार आहेत. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर कसब्यात केलेली विकासकामे आणि संघटना बांधणीमुळे भाजपने रासनेंच्या नावाला पसंती दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपच्या सर्व सर्व्हेत हेमंत रासने यांचेच नाव आघाडीवर राहिले, त्यामुळे अखेर भाजपने रासने यांच्या नावावरच उमेदवारीची मोहोर लावली आहे.
हे देखील वाचा-PM Narendra Modi : डीजिटल अरेस्टपासून कसा बचाव कराल? PM नरेंद्र मोदींनी सांगितल्या या खास टीप्स
भाजपने पुण्यात जाहीर केलेले उमेदवार
खडकवासला – भीमराव तापकीर
कॅन्टोंनमेंट – सुनील कांबळे
कसबा – हेमंत रासने
कोथरूड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
हे देखील वाचा-Maharashtra Election 2024 : अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; पारनेरमध्ये दाते विरुद्ध लंके सामना रंगणार
कोथरूड मतदारसंघ सुरुवातीपासूच चर्चेत राहिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जवळपास मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. मतदारसंघातून भाजपने चंद्रकांत पाटील आणि तर मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली. पण दुसर्या बाजूला ठाकरे गटाकडून आठ दिवसापासून केवळ चर्चा होत्या. लवकरच उमेदवार जाहीर करू असं सांगण्यात येत होतं. या दरम्यान माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि पुणे महापालिकेतील ठाकरे गटाचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नावांची चर्चा होती.