भाजपचे वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आणि त्यानंतरही शरद पवार यांनी भाजप आणि महायुतीला मोठे धक्के दिले आहे. कोल्हापूरमधील कालग मतदारसंघातील भाजपचे मोठे नेते समरजित घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी तुतारी हाती घेतली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि काही नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दरम्याने अर्ज दाखल करण्याासाठी दोन दिवस शिल्लक असताना विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्ञायक हे आता तुतारीच्या चिन्हावर कारंजा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ज्ञायक पाटणी यांनी मुंबईत समर्थकांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
हे देखील वाचा-Maharashtra Election : RPI ला अद्याप एकही जागा नाही, ‘दादां’कडून १० जागांची मागणी; थेट दिल्लीतून आला हा हुकूम
राजेंद्र पाटणी यांचे फेब्रुवारीमध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र ज्ञायक पाटणी हे कारंजामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपकडून त्यांना ऐनवेळी डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांनी आज त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी चिन्हावर या ठिकाणावरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ॲड. ज्ञायक पाटणी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
सर्व… pic.twitter.com/a0XTxY2IQG
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 26, 2024
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी समरजित घाटगे यांनी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 3 सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौक येथे ते शरद पवार, सुप्रिया सुळे, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे कागलचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधासभा निवडणुकीतील अडचणी वाढल्या आहेत. समरजित सिंह कागलमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते.
हे देखील वाचा-Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये दोन चंद्रकांत आमनेसामने, ठाकरे गटाने ए.बी फॉर्मही दिला
समरजितसिंह घाटगे देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय मानले जात होते. मात्र घाटगे निवडणूक लढण्यावर ठाम होते. खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही निष्फळ ठरला होता. कारण आज कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात घाटगेंनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यांनंतर घाटगे यांनी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनींही तुतारी हाती घेतली.