Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण कर्जमाफी आणि कृषिपंपांना मोफत वीज…; भाजपने शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, काय आहे भावांतर योजना?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा सरकार आल्यास आपल्या संकल्पपत्राममधून शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवणार असल्याचे जाहीर केले आहे. नेमकी काय आहे भावांतर योजना?

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2024 | 10:47 AM
भाजपने शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, काय आहे भावांतर योजना? (फोटो सौजन्य-X)

भाजपने शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, काय आहे भावांतर योजना? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

भाजपाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात मोठ्या घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पपत्रात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीरनाम्यात मोठी तरतूद केली असून अगदी लाडक्या बहिणीपासून, तरुण ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. मात्र या संकल्पपत्रात भावांतर योजना जाहीर करण्यात आली आहे. काय आहे ही भावांतर योजना? तिचा काय होईल शेतकऱ्यांना फायदा?

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

भाजपने संकल्पपत्रात जारी केलेल्या भावांतर योजनेचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना जाहीर करण्यात आली आहे. हमी भावापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांकडून खरेदी झाली तर फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने या विषयावर निर्णय घेतला होता. पण आचारसंहितेची अंमलबजावणी करता आली नाही. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्या वर्षी करून दाखवल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे ज्या अन्नधान्यांची हमी भावाने खरेदी होईल. बाजारात त्यांना जर योग्य किंमत मिळाली नाही तर सरकार फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.

हे सुद्धा वाचा: दादरच्या शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधानांची सभा; मुंबईत ट्रॅफिक अलर्ट, महत्त्वाचे मार्ग बंद

भाजपने आपल्या संकल्पपत्रात भावांतर योजनेचा उल्लेख केला आहे. यासोबतच संपूर्ण कर्जमाफी, कृषिपंपांना मोफत विजेची ग्वाहीदेखील दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील सभेत भावांतर योजनेचा उल्लेख केला. ‘मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळले. यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार’, असे वचनही फडणवीस यांनी दिले. यानंतरही आपल्या सभांच्या माध्यमातून फडणवीस यांनी भावांतर योजनेची माहिती दिली.

दरम्यान महायुती सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा देत भावांतर योजना काही महिन्यांपूर्वीच राज्यात लागू केली. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट मिळाले. दोन हेक्टरच्या मर्यादेत हा दिलासा देण्यात आला. राज्याचा विचार करता जवळपास ६२ लाख शेतकऱ्यांना २,७०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा बाजारात कमी दर मिळाल्यास यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना सरकार देते.

सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळणार

दिवाळीच्या दिवसांत सोयाबीनची विक्री करून शेतकरी खरेदी करतो. रब्बी हंगामातील पेरणीची तजवीजही याच पिकातून साधारणत: केली जाते. या पिकाला चार-साडेचार हजार रुपयांचा भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होता. पण, भाजपने आपल्या संकल्पपत्रात सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा दर घोषित केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठीचा मुहूर्त साधारण महिनाभरावर ढकलला आहे. सोयाबीन उत्पादक भागात या सहा हजार रुपयांच्या भावाची चर्चा वाढली आहे.

हे सुद्धा वाचा: ऐन थंडीत राज्यावर पावसाचंही सावट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून यलो अलर्ट जारी

Web Title: Maharashtra elections 2024 bjps bhavantar yojana gains farmers trust with guaranteed crop prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly Elections 2024

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.