Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला तिलांजली, बेफिकीर अन् टपोरीपणासारखे…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 12:25 PM
सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला तिलांजली, बेफिकीर अन् टपोरीपणासारखे...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला तिलांजली, बेफिकीर अन् टपोरीपणासारखे...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला तिलांजली
  • सरकारचे कामकाज बेफिकीर आणि टपोरीपणासारखे
  • हर्षवर्धन सपकाळांची टीका
पुणे : महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रत्येक अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतो आणि लोकशाहीला तिलांजली देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. सरकारचे कामकाज अत्यंत बेफिकीर आणि टपोरीपणासारखे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला.

 

हे सरकार लुटारू असल्याचा गंभीर आरोप करत सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. पुणे-मुंबईतील कथित जमीन घोटाळ्यांमध्ये किती आर्थिक गैरव्यवहार झाला, याची माहिती जनतेसमोर आणावी, अशीही मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी काशीराम कोतवाल यांच्या पद्धतीशी तुलना केली.

महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर येत असल्याचा दावा करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या तत्त्वानुसार काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस यापुढे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड करारामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याचा दावा केला. राज्यभर पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत हिंगोली आणि यवतमाळ येथे रॅली आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘एपस्टीन फाईल’ प्रकरणामुळे अनेक नैतिक प्रश्न समोर आले असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नरवणे यांच्या पुस्तकाबाबतही खुलासा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा : उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, म्हणाले; पुढील तीन ते चार महिन्यात…

काँग्रेस हा संविधानावर विश्वास ठेवणारा पक्ष असून हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे योग्य असले तरी चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी कायम राहावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुपस्थितीबाबत मात्र आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the government at a press conference in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

“पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप,” हर्षवर्धन सकपाळ यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा
1

“पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप,” हर्षवर्धन सकपाळ यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

भाजपचा ‘शिंदे पॅटर्न’ सोलापुरात? विधानपरिषदेसाठी महिला चेहऱ्याला संधीची जोरदार चर्चा; अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीवर सस्पेन्स कायम
2

भाजपचा ‘शिंदे पॅटर्न’ सोलापुरात? विधानपरिषदेसाठी महिला चेहऱ्याला संधीची जोरदार चर्चा; अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीवर सस्पेन्स कायम

Gopichand Padalkar: हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके सडलेल्या कांद्यासारखे आहे; भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर तोफ
3

Gopichand Padalkar: हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके सडलेल्या कांद्यासारखे आहे; भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर तोफ

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन
4

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.