Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेआधी मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! राज्य सरकारने घेतला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णय

राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा महत्वाचा बनला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत. सातत्याने सरकारला इशारा देत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2024 | 02:00 PM
विधानसभेआधी मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! राज्य सरकारने घेतला 'हा' अत्यंत महत्वाचा निर्णय

विधानसभेआधी मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! राज्य सरकारने घेतला 'हा' अत्यंत महत्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:

राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी राज्य सरकार अनेक योजना आणि अनेक निर्णय कॅबिनेट बैठकीत घेत आहे. दरम्यान आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणविषयी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारने निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे.

लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची  शक्यता आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत जवळपास ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.

राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा महत्वाचा बनला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत. सातत्याने सरकारला इशारा देत आहेत. दरम्यान राज्य सरकारने यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे.

मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आंदोलन करत आहेत. दरम्यान सगेसोयरेची अंमलबजावणी करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारला अखेरचा इशारा देत जालना जिल्ह्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणस सुरूवात केली होती. तसेच आरक्षण न दिल्यास त्यांनी निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करण्याचे संकेत देखील दिले आहेत. तसेच जरांगे पाटील हे सातत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला नी खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्य सरकरके आता अहवाल स्वीकारले आहेत, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची पुढील भूमिका काय असणार हे पहावे लागणार आहे.

Web Title: Maharashtra government cabinet approves justice shinde second and third report for maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 01:39 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
1

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
2

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण
3

Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी
4

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.