Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Monsoon Updates: पुराच्या पाण्यामुळे कल्याण-डोंबिवलीची जलवाहिनी फुटली; नागरिकांवर पावसाचे पाणी उकळून पिण्याची वेळ

Ulhas River Flood : ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आल्याने मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यातच नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची (KDMC) मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा गेल्या ४८ तासांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 09, 2026 | 10:33 AM
Kalyan Dombivli, Ulhas River Flood, KDMC, Mumbai Local Train, Water Crisis, Monsoon 2026

Kalyan Dombivli, Ulhas River Flood, KDMC, Mumbai Local Train, Water Crisis, Monsoon 2026

Follow Us
Follow Us:
  •  १ जुलैपासून राज्यात सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे अवघ्या ६ दिवसांतच पूर्ण जून महिन्याची सरासरी भरून निघेल इतका पाऊस
  • उल्हास नदीला पूर आल्याने मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे
  • कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व व पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा फटका
Maharashtra Monsoon Updates:  जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीलाच संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. १ जुलैपासून राज्यात सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे अवघ्या ६ दिवसांतच पूर्ण जून महिन्याची सरासरी भरून निघेल इतका पाऊस कोसळला आहे. सततच्या संततधारेमुळे अनेक भागांत पाणी साचले असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे गेल्या पाच दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. यंदा २ जून रोजीच मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता, परंतु त्यानंतर अनेक दिवस तो अरबी समुद्रातच रेंगाळल्याने जून महिना कोरडा गेला. अखेर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे सेवेवरही याचा थेट परिणाम झाला होता.

उल्हास नदीला पूर; कल्याण-डोंबिवलीत पाण्यासाठी हाहाकार

ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आल्याने मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यातच नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची (KDMC) मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा गेल्या ४८ तासांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व व पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा फटका बसला आहे. बेतुरकर पाडा परिसरातील महिला बादल्या, टब आणि ड्रममध्ये थेट पावसाचे पाणी साठवून आपली गरज भागवत आहेत, तर काही नागरिकांवर हे पावसाचे पाणी गाळून आणि उकळून पिण्याची वेळ आली आहे.

हवामान विभागाचा ‘या’ भागांना हायअलर्ट:

मुंबई आणि कोकण: मुंबईत रात्री पाऊस सुरू होता, मात्र सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. कोकणातही पावसाचा जोर ओसरला असून आज कोकण किनारपट्टीसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पुणे आणि सातारा: भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात ‘अतिमुसळधार’ पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुजरात आणि केरळच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मॉन्सून संपूर्ण देशात सक्रिय झाला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथा परिसरात पाऊस हजेरी लावेल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title: Maharashtra heavy rain july kalyan dombivli water crisis ulhas river flooded kdmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Monsoon 2026

संबंधित बातम्या

Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसे संघर्ष पेटला; ‘सलाम-डकार’वरून नंदू परब आणि मनसे आमनेसामने
1

Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसे संघर्ष पेटला; ‘सलाम-डकार’वरून नंदू परब आणि मनसे आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.