Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! हॉल तिकीट आता…

राज्यातील एकूण ७००० परीक्षा केंद्रांवर हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यापैकी ५००० केंद्रे दहावीच्या परीक्षांसाठी आणि ३००० केंद्रे बारावीच्या परीक्षांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2025 | 02:08 PM
HSC Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आता हॉल तिकीट...

HSC Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आता हॉल तिकीट...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी जवळ आल्या आहेत, आणि राज्यभरात विद्यार्थी आपल्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पेपर फुटी आणि परीक्षा हॉलमधील कॉपीसारख्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. या समस्येला रोखण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत प्रत्येक परीक्षा कक्षात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

राज्यातील एकूण ७००० परीक्षा केंद्रांवर हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यापैकी ५००० केंद्रे दहावीच्या परीक्षांसाठी आणि ३००० केंद्रे बारावीच्या परीक्षांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान १० CCTV कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे परीक्षा हॉलमधील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर फुटी किंवा कॉपीसारख्या गैरप्रकारांसाठी वाव मिळणार नाही. यामुळे परीक्षेची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

CCTV कॅमेरे बसवण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. एका कॅमेऱ्यासाठी २० ते २२ हजार रुपये इतका खर्च येणार आहे. राज्यातील अनेक शाळा आणि शिक्षण संस्था यासाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. त्यांनी शिक्षण मंडळाने या कार्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली आहे. तसेच काही शाळांनी आर्थिक मदतीशिवाय हा निर्णय अंमलात आणणे कठीण असल्याचेही नमूद केले आहे. हा निर्णय लागू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल प्रामाणिकतेची भावना वाढीस लागेल. पेपर फुटी आणि कॉपीसारख्या घटनांवर अंकुश लावण्यास मदत होईल. शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास पुन्हा दृढ होईल.

हेही वाचा: SSC And HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘आता परीक्षा केंद्रावर…’

यंदाच्या वर्षी कधी आहे SSC आणि HSC परीक्षेचे आयोजन?

दहावीच्या विद्यार्थ्यांची यंदाची बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच याचा काळात बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. कॉपी केस तसेच इतर गोष्टी टाळण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Web Title: Maharashtra hsc board give online hall tickets to the all hsc studetns marathi exam news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Exam Hall Ticket

संबंधित बातम्या

DFCCIL प्रवेशपत्र २०२५ ‘या’ अधिकृत संकेतस्थळावर जाहीर, असे करा डाउनलोड
1

DFCCIL प्रवेशपत्र २०२५ ‘या’ अधिकृत संकेतस्थळावर जाहीर, असे करा डाउनलोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.