Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजय; जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने आघाडी

  • By युवराज भगत
Updated On: Jun 04, 2024 | 05:17 PM
राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजय; जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने आघाडी
Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Lok Sabha Election 2024 : बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजय झाला आहे. ही लढाई खूपच मोठी प्रतिष्ठेची झाली होती. कारण पवार विरुद्ध पवार अशी लढाई होती, परंतु एकाच कुटुंबातील ही लढाई होती. यामध्ये खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये होती. या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले, त्याचबरोबर बळाचा वापर झाला. परंतु, मतदाराजांचा कौल आता समोर आला आहे.

मतदानाच्या दिवशी पैशांचा वापर

सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर अजित पवारांची मोठी गोची झाली आहे. कारण यामध्ये त्यांच्या प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात लागली होती. अगदी मतदानाच्या दिवशीसुद्धा अजित पवारांकडून पैशांचा वापर झाल्याचे आरोप रोहित पवारांनी केले होते. प्रचारादरम्यान तर रोहित पवारांच्या डोळ्यातील अश्रूसुद्धा दिसून आले. त्यामुळे ही लढाई मोठ्या प्रमाणात भावनिक झाल्याचे पाहायला मिळाली.

सुप्रिया सुळेंना महाविकास आघाडीकडून तिकीट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवारांचा गट भाजपाप्रणित महायुतीत आणि राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झाला. तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीबरोबर विरोधात उभा राहिला आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट दिलं होतं.

अजित पवारांनी पत्नी उतरवले रिंगणात

तर अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिगणात उतरवलं होतं. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष चालू आहे. या संघर्षात नणंदबाई म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या असतात. बारामती मतदारसंघातील मतमोजणीच्या १६ फेऱ्या पूर्ण झाल्या असून सुप्रिया सुळे यांना तब्बल ९३,८२८ मतांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुप्रिया सुळे यानी आघाडी मिळवली असून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर ही आघाडी वाढत गेली आहे. आता केवळ दोन फेऱ्यांमधील मतमोजणी बाकी असून सुप्रिया सुळे जवळपास विजयाच्या समीप असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी त्यांच्या बारमतीचा गड राखण्यात यश मिळवल्याची सर्वत्र चर्चा आहे.

Web Title: Maharashtra lok sabha election 2024 supriya sules victory from baramati constituency nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 05:06 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Lok Sabha Election 2024
  • Mahavikas Aghadi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी
3

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.