Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2025 | 09:52 PM
Almatti Dam: 'अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने...'; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

Almatti Dam: 'अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने...'; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण  आणि  हिप्परगी बंधाऱ्यामधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली.

श्रमशक्ती भवन येथे आज झालेल्या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील खासदार आणि आमदार शिष्टमंडळात सहभागी होते. सेंट्रल वॉटर बोर्ड कमिशनचे अध्यक्ष, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधान सचिव देबाश्री मुखर्जी बैठकीत उपस्थित होत्या.

कर्नाटक राज्यशासनाने अलमट्टी धरणाची पूर्ण साठवण पातळी (FRL) ला 519.60 मीटरवरून 524.256 मीटर वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला असून, मात्र सध्या असणाऱ्या धरणाच्या उंचीमुळे वर्ष 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. भविष्यातही अतिवृष्टी झाल्यास या धरणाच्या बॅक वॉटरमुळे अधिक मोठे नुकसान होऊ शकते. भविष्यात होणारी आपत्ती टाळण्यासाठी आज राज्याच्या जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेत शिष्टमंडळने केंद्रीय मंत्री यांची भेट घेतली.  बैठकीत सविस्तर चर्चेअंती केंद्रीय मंत्री पाटील यांनी राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरण यांच्याकडून कर्नाटक सरकारने अलमट्टी धरन बाधतांना केलेल्या अनियमिततेची तपासणीचे निर्देश दिले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत राज्य शासनाच्यावतीने झालेल्या अभ्यासानुसार अलमट्टी धरणमुळे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये पाणी तुंबणे वाढले आहे, त्यामुळे नदीच्या वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. सांगली आणि कोल्हापूर येथे पूराच्या पाण्याचा ओसरण्याचा वेग कमी झाला आहे.  यामुळे लगतच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नेहमीसाठी पूर परिस्थिती निर्माण झाली असून या परिसरातील जीवनमान बिघडले आहे. शेतीवर तसेच नागरी जीवनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.

Almatti Dam: अलमट्टीचा वाद पेटणार? CM फडणवीसांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र; उंची वाढवू नये अन्यथा…

CM फडणवीसांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अलमट्टी धरणाचा वाद सुरु आहे. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रातून धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra minister radhakrishna vikhe patil demand central govermnet interfare interfere almatti dam case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 09:52 PM

Topics:  

  • Central government
  • Flood situation
  • Karnataka
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू
1

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त
2

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
3

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा, ११ लाख रुपयांचा दंड
4

Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा, ११ लाख रुपयांचा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.