Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक! राज्यातील अनेक भागांत बरसला, २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान कुठे-कुठे बरसणार?

Maharashtra Monsoon Return Update: राज्यातील काही भागांत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने पाण्याचे संकट काही प्रमाणात दूर होण्यासह पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 21, 2026 | 08:54 PM
Maharashtra Monsoon Return Update

Maharashtra Monsoon Return Update

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात मान्सूनचा पुन्हा धडाका
  • रायगड, पुण्यासह अनेक भागांत पावसाची हजेरी
  • २२ ते २७ सप्टेंबरला कुठे बरसणार?
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागांत पिकं धोक्यात आली होती. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. अशातच आता नगर, रायगड आणि पुण्यासह राज्यातील काही भागांत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पाण्याचं संकट काही प्रमाणात दूर होण्यास मदत होण्याची शक्यता असून, पिकांना देखील दिलासा मिळणार आहे.

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने दमदार पुनरागमन केलं. खालापूर, कर्जत, खोपोली, रसायनी आणि माथेरान परिसरात जोरदार पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला. अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट, ढगांचा मोठा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

अहिल्यानगरात तीन महिन्यांनंतर जोरदार पाऊस

अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.राज्यातील अनेक भागांत पिकं करपण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस झाला, तर शेतकरी आणि जनावरांसाठी मोठा दिलासा मिळू शकतो.

जतच्या आठवडी बाजारात भाजीपाला वाहून गेला

सांगलीच्या जत तालुक्यातील दरी बडची येथे मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे आठवडी बाजारात पाणीच पाणी झालं. पाण्याच्या लाटेत बाजारातील भाजीपाला वाहून गेल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तासगाव तालुक्यातील सावळजमध्येही जोरदार पाऊस झाला.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. आठवडी बाजारातील व्यापारी आणि ग्राहकांची यामुळे धावपळ उडाली. काही व्यापाऱ्यांचा भाजीपाला पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झालं. दुसरीकडे, पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांना नवसंजीवनी मिळावी यासाठी शेतकऱ्यांना आता आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

२२ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाचा अंदाज

हवामानाच्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ सप्टेंबर, तर मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान, तर मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाच्या काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात गरबा खेळण्यासाठी मुलींची ‘बोली’? 1000 ते 5000 रुपयांपर्यंत बोली लावली जात असल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा

Web Title: Maharashtra monsoon rain update 22 27 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Maharashtra Monsoon
  • Maharashtra Rain Update
  • Monsoon 2026
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट
1

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.