नवभारत नवराष्ट्र कॉन्क्लेव्ह
MH 1st Conclave 2025: महाराष्ट्र वेगाने पुढे सरसावतो आहे. आज प्रत्येक क्षेत्रात आपले राज्य एक विकसनशील राज्य बनत आहे. मुंबई,पुणे, नागपूर आणि अनेक शहरात नवनवे उद्योग सुरु होत आहेत, जे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत आहे. महाराष्ट्राची वाटचाल आता $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे जात आहे.
1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे हे महाराष्ट्राचे स्वप्न आहे. हा केवळ एक आकडा नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या चांगल्या जीवनाचे स्वप्न आहे. मजबूत रस्ते, जलद गतीने चालणाऱ्या पायाभूत सुविधा, आधुनिक शेती, उद्योगांमध्ये गुंतवणूक, नवीन रोजगाराच्या संधी आणि महिला सक्षमीकरण. या सर्वांसाठी हे ध्येय खूप महत्वाचे आहे.
23 ऑगस्ट रोजी नवभारत आणि नवराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा MH 1st Conclave 2025 हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या कार्य्रमात राज्याचे सर्वोच्च नेतृत्व आणि तज्ञ 1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठण्यासाठी कोणती धोरणे, निर्णय आणि दृष्टीकोन आवश्यक आहे यावर चर्चा करतील.
हा कॉन्क्लेव्ह फक्त एक कार्यक्रम नसून तो महाराष्ट्राची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी एक महत्वाचा व्यासपीठ आहे – जिथे विकास आणि लोकांचा आवाज एकत्र येऊन नवीन गोष्टी निर्माण करतील. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.