
Maharashtra Local Body Election Date Announce
Municipal Corporation Grampanchayat ZP Election Date : राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Local body Election) अखेर आज (4 नोव्हेंबर) बिगुल वाजले आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आले. निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि एकूण 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
तसेच 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच 15 नवीन नगरपंचायती आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आल्यामुळे ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पण, निवडणूक आयोगाने मतदार याद्यांसाठी ७ नोव्हेंबरपासूनच्या याद्या वापरणार आहे. निवडणूक ही EVM मशीन द्वारेच होणार आहे. नगरपरिषदेसाठी एका मतदाराला २ ते ३ मतदान करता येईल तर नगरपंचायतीसाठी २ मतदान करता येईल.
दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे असे राज्य निवडूक आयोगाने म्हटले आहे.
दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे राज्य निवडणूक आयोगने सांगितले.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ या अंतिम मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर वेळेच बंधन आले असून अखेर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर करावी लागली.
या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगरपंचायती, ३३६ पंचायत समित्या, २४६ नगरपालिका या सर्व संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेसाठी निवडणुकांची प्रतीक्षेत होते.
या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट) यासह राज्यातील सर्व पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
पहिला टप्पा: राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका
दुसरा टप्पा: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका
तिसरा आणि शेवटचा टप्पा: नगरपालिका निवडणुका